महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 18, 2022, 7:57 PM IST

Updated : Jan 18, 2022, 10:09 PM IST

ETV Bharat / city

Corona Positive MLA attend Agitation : नागपुरात चक्क कोरोना पॉझिटिव्ह आमदार उतरले आंदोलनात

पूर्व नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे (BJP MLA Krishna Khopade) यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन केले. पण स्वतःच खोपडे कोरोना पॉझिटिव्ह (Krishna Khopade Corona Positive) आहेत.

MLA krishna khopade attend Agitation
कोरोना पॉझिटिव्ह आमदार कृष्णा खोपडे उतरले आंदोलनात

नागपूर - पूर्व नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे (BJP MLA Krishna Khopade) यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर पटोलेंविरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण स्वतःच खोपडे कोरोना पॉझिटिव्ह (Krishna Khopade Corona Positive) आहेत. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार सात दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण न होताच नियम मोडत ते बाहेर पडल्याने नवीन वाद सुरू झाला आहे.

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे
  • कोरोना पॉझिटिव्ह असल्यास हे नियम पाळा -

आमदार कृष्णा खोपडे हे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तरीही त्यांनी कार्यकर्ते गोळा करून कोरोना नियमांचा भंगच केला असून, कोरोनाचा प्रसारही करण्यास ते कारणीभूत आहेत अशी चर्चा सध्या नागपुरात सुरू आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्यापासून सात दिवस घराबाहेर न पडता विलगीकरणात राहावे असा नियम आहे. यात शेवटचे तीन दिवस ज्यामध्ये पाचवा, सहावा आणि सातवा कुठलेही लक्षणं नसावे अन्यथा हा कालावधी वाढतो असाही नियम आहे.

  • आमदार कृष्णा खोपडे यांचे स्पष्टीकरण -

आमदार कृष्णा खोपडे यांना यासंदर्भात विचारणा केली असता, मी पाच दिवस घरात होतो. 12 जानेवारीला केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल 13 जानेवारीला आला. त्यानंतर पाच दिवस घरी असल्याचे आमदर खोपडे यांनी सांगितले. खोपडे पुढे म्हणाले, आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीच मनपाचे आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की तीन दिवस कुठलेही लक्षणं नसल्यास आपण बाहेर जाऊ शकता, हे माहिती घेऊन मी आंदोलनात सहभागी झालो.

  • पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती -

या संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने मनपाचे आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्याशी संपर्क केला. त्यावर मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोना संक्रमित व्यक्तीला रिपोर्ट आल्यापासून किमान सात दिवसाचा गृह विलगीकरण आवश्यक आहे. 7 दिवसाच्या गृह विलगीकरणाच्या अखेरचे तीन दिवस कोणतेही लक्षणे नसणे आवश्यक आहे तरच बाहेर पडू शकतो, असे चिलकर यांनी सांगितले.

त्यामुळे आमदार कृष्णा खोपडे यांनी आंदोलन करण्यासाठी कोरोनाच्या नियमांचा भंग केला आहे का? आमदार म्हणून ते सार्वजनिक जबाबदारीचे भान विसरले आहे का? असे प्रश्न या आंदोलनानंतर समोर येत आहेत. त्यामुळे यावरुन पुन्हा नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Jan 18, 2022, 10:09 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details