नागपूर -नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा नागरिकांमध्ये बेजबाबदारपणा वाढला आहे. अशातच आता नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरातील एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने सर्व सहा कोरोनाबाधित सदस्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. सहाही रुग्ण डेल्टा प्लस या नवीन कोरोना व्हेरियंटचे संशयित असल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
- नमुने तपासणीसाठी हैदराबादला पाठवले -
नागपूर शहरात आणि जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या जवळजवळ एक लाखांच्या घरात पोहचली होती. मात्र, त्यानंतर नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड वेगाने कमी झालेली आहे. त्यातच मृत्यूचे आकडेसुद्धा नियंत्रणात आल्याने आता सक्रिय रुग्णांची संख्या केवळ १५० राहिलेली आहे. कोरोनाची भीती सर्वसामान्य नागरिकांच्या मनातून कमी होत असताना काल लक्ष्मी नगर झोन परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्या सर्वांना सौम्य लक्षणं आहेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने त्या सर्वांना आमदार निवास येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले आहे. एवढचं नाही तर या सहाही पॉझिटिव्ह रुग्णांची प्रवास हिस्ट्री असल्याने त्यांना डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे संशयित मानून त्याच्या नाकातील आणि घशातील स्वॅब हैदराबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, ज्यांचा अहवाल आज रात्री किंवा उद्यापर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- नागपूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही-