नागपूर - आपण खाद्य पदार्थ बनवण्याच्या अनेक स्पर्धा पहिल्या असतील. पण नागपूरात कमीत कमी पाण्याचा उपयोग करून स्वादिष्ट व्यजंन तयार करण्याची आगळी वेगळी स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा 'विष्णुजी की रसोई' येथे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या निरीक्षणात घेण्यात आली. या स्पर्धेचे मुख्य हेतू होता जागतिक जल दिनानिमित्त स्वयंपाक घरात पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याचा संदेश देण्यासाठी. त्यासाठीच 'जल रेसिपी' ही खास स्पर्धा घेण्यात आली. यात गृहिणींना रोज सहज स्वयंपाक घरात जेवण बनवण्याचा अनुभव असला तरी या स्पर्धेत खाद्यपदार्थ बनवताना काय आव्हान आले जाणून घेऊ या विशेष रिपोर्ट मधून...
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ इतका भयानक असतो की, कळशीभर पाण्यासाठी मैलभर अंतर कापून तासभर बसून वाट्याने पाणी भरणारे दुर्भिक्ष चित्र अनेक भागात आजही पाहायला मिळते. त्यामुळे महिलांना पाण्याचा वापर करताना काटकसर असतेच पण हाच संदेश घरोघरी पोहचावा या उद्देशाने विदर्भ पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग, आणि भारतीय जलसंसाधन संस्थेच्या वतीने ही स्पर्धा घेत व्यापक जनजगृती करण्यात आली. नागपुरात झालेली स्पर्धा होती तरी कशी यामध्ये विविध क्षेत्रातील महिलांचे प्रत्येकी पाच महिलांच एक गट अशा पद्धतीने 10 गटात 50 महिलांचा सहभाग करून ही स्पर्धा घेण्यात आली. यात कमीत कमी पाण्याच्या उपयोग करून खाद्यपदार्थ करायचे होते. चवीला चवदार आणि दिसायला आकर्षक सजावट करून सादरीकरण करायचे होते. यात प्रत्येक गटाला पदार्थ बनवण्यासाठी दोन लिटर पाणी देण्यात आले होते. सर्वाना भाजी धुण्यासाठी एकाच मोठ्या पातेल्यात पाणी देण्यात आले. यात भाजी देतांना जरी डिश बनवण्याचा निर्णय त्या त्या गटाला घ्यायचा होता. पण यात भाजीपाला किंवा फळ देतांना रसाळ फळभाज्या देण्यात आल्यात. जेणेकरून फळ भाज्यांमध्ये असलेल्या पाण्याचा उपयोग खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.
यात स्वयंपाक गृहात अनेक छोट्या छोट्या बाबी असतात ज्याचे पालन केल्यास मोठा फायदा पाणी बचतीसाठी होऊ शकतो असेही सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितले. या स्पर्धेतून महिलांमध्ये जलजागृती करून यातूनच घरातील प्रत्येक सदस्याला पाण्याचे महत्व पटवून दिल्यास व्यापक स्वरूपात जनजागृती होऊ शकेल. यामुळे जल रेसिपी स्पर्धेतून जल जागृती करण्याचे ठरवल्याचे जल अभ्यासक महाराष्ट्र जल भूषण पुरस्कार प्राप्त प्रवीण महाजन यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले. यावर उदाहरण देताना म्हणाले की चार लोकांसाठी खिचडी बनवतांना कितीतरी पाणी तांदूळ धुण्यासाठी लागते. पण योग्य नियोजन केल्यास पाण्याचा अपव्यय टाळला जाऊ शकतो असेही महाजन म्हणालेत. पाच महिलांनी बनवले पदार्थ यात सहभागी कोणी घेतला ही स्पर्धा खास ठरण्यासाठी आणखी एक कारण म्हणजे यात 10 क्षेत्रातील म्हणजेच वकील, डॉक्टर, राजकीय, लेखक कवी, इंजिनियर, शिक्षिका, जेष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, कलावंत, गृहिणी यांना हे पदार्थ बनवायचे होते. यात विशेष म्हणजे पूर्वी फार काही ओळख नसतांना काही क्षणात उपलब्ध भाज्यांच्या माध्माँयमातून कुठला पदार्थ तयार करायचा याचा निर्णय घ्यायचा होता. यात एकापेक्षा अधिक डिश तयार करायच्या होत्या. प्रत्येकाना एक तास देण्यात आला. पाच महिलांनी मिळून नवीन डिश बनवल्या आहे. यात सजावट केल्यानंतर सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर त्याची चव चाखून गुणांकन दिले. पण पहिल्यांदाच अश्या पद्धतीने खाण्याचे पदार्थ बनवणाला जलजागृतीशी जोडण्यात आले. त्यामुळे पदार्थ खास ठरलेच आणि स्पर्धा ही तेवढीच खास ठरली.