नागपूर -नागपूर शहरात रविवारी दमदार पावसाने हजेरी ( Nagpur rains update ) लावली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक ( Nagpur traffic update ) बंद पडली. खोलगट भाग असल्याने पडोळे चौकातून प्रतापनगरच्या दिशेने जात असलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.
तरुण धावले मदतीला -अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. वाहन चालकांना अडचण येऊ नये म्हणून नागपुरातील अनेक नागरिक विशेषतः तरुण भर पावसात मदतीसाठी बाहेर पडल्याचे चित्र पहायला मिळाले. एका बाजूची वाहतूक बंद करत येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना रस्ता दाखवत मार्ग काढून देण्याचे काम स्थानिक तरुणांनी रस्त्यावर उतरून केले. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यावर नागपुरातील रस्त्यांवर हेच चित्र बघायला मिळते. यंदाही या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही.