नागपूर -आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घोडझरी प्रकल्पांची पाहणी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींना कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याने आमदार बंटी भंगडीया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक राजकारण बाजूला ठेऊन स्थानिक आमदारांना दौऱ्यात सहभागी करून घेणे अपेक्षित होते, मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशाने आम्हाला डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मागे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार असल्याचं ते म्हणाले आहेत.
विदर्भासाठी वरदान असणाऱ्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा जिल्ह्याचा दौरा केला आहे. गोसेखुर्द प्रकल्पासोबतच त्यांनी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी प्रकल्पातील कालव्यावरील नॅशनल हायवे क्रॉसिंगची देखील पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात संबंधित विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना मिळणे अपेक्षित होते, मात्र दोन्ही विभागांकडून कोणतीही सूचना न मिळाल्याने आमदार बंटी भंगडीया यांनी संताप व्यक्त केला. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना जाणिवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोपीही त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा आम्ही रोखला नाही