महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Youth Half-Naked Protest in Nagpur : युवक काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन... नरेंद्र मोंदीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी ( Sonia Gandhi questioned by ED ) सुरु आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या पदाधिकरी यांनी अंगावरील शर्ट काढून ईडी कारवाईचा विरोधात अर्धनग्न आंदोलन केले. हातात आणि डोक्यावर पट्ट्या काढून त्यांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

Youth Half-Naked Protest in Nagpur
युवक काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन

By

Published : Jul 27, 2022, 6:21 PM IST

नागपूर -काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी ( Sonia Gandhi questioned by ED ) सुरु आहे. याविरोधात नागपूर येथे अर्धनग्न आंदोलन ( Youth Half-Naked Protest in Nagpur ) केले. आज सकाळी कॉंग्रेस कमिटी आणि शहार अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दुपारी त्याच परिसरातील डब्ल्यूसीएल चौकात ईडीची कारवाईचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न होत असलेल्या आंदोलनावर कारवाई करण्यात आली.

युवक काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन

कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकरी यांनी अंगावरील शर्ट काढून ईडीच्या कारवाईचा विरोधात आंदोलन केले. हातात आणि डोक्यावर पट्ट्या काढून त्यांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

युवक कॉंग्रेसने वेधले लक्ष - नागपूर शहरात मागील दोन दिवसापासून काँग्रेस कमिटीचे आंदोलन होत आहे. त्यातच आता युवक काँग्रेसने आक्रमक होत अर्धनग्र आंदोलन करत लक्ष वेधून घेतले आहे. मंगळवारी झालेल्या जीपीओ पोस्ट ऑफिस चौकात त्यांनी भंगार कार पेटवून लक्ष वेधून घेतले होते. तेच आज सकाळपासूनच युवक काँग्रेसचे आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलीस सतर्क आणि मोठा फौजफाटा असताना पोलिसांना हुलकावणी देत दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास डब्ल्यूसीएल चौकात शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन करत पुन्हा लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा -Deepak Kesarkar : 'महाविकास आघाडी सरकारच्या कामाच्या वेगापेक्षा शिंदे सरकारच्या कामाचा वेळ अधिक'

ABOUT THE AUTHOR

...view details