नागपूर -पेगासस हेरगिरी प्रकरणात चौकशीसाठी नेमलेल्या नियुक्त समितीच्या अहवालानंतर तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ज्यांनी या हेरगिरीचे आदेश दिले, त्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. तसेच येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा रेटून धरला जाईल, असेही अतुल लोंढे म्हणाले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
Atul Londhe Nagpur : पेगासस हेरगिरी प्रकरणाची सखोल चौकशी करा - अतुल लोंढे - फोन टॅपिंग प्रकरण
चौकशी समितीच्या अहवालात केवळ रश्मी शुक्ला यांना दोषी धरून चालणार नाही. कारण केवळ एक अधिकारी इतकी मोठी हिम्मत करणार नाही. पण यामध्ये आणखी काही लोकांचे हात गुंतले आहे. यासाठी या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या आदेशानुसार ही फोन टॅपिंग करण्यात आली, त्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

अतुल लोंढे
माध्यमांना माहिती देताना अतुल लोंढे
Last Updated : Feb 28, 2022, 4:56 PM IST