नागपूर- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खासदारकीला आवाहन देणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. त्या याचिकेवर आता ६ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि वर्तमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना उत्पन्नाची माहिती लपवल्याचा आरोप या याचिकेत कऱण्यात आला आहे.
नितीन गडकरी यांच्या खासदारकीला नाना पटोलेंचे न्यायालयात आव्हान; सुनावणी ६ ऑगस्टला - nagpur latest news
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या या याचिकेत पटोले यांनी गडकरी यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीवेळी गडकरी यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या माहितीमध्ये त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत शेती असल्याचे नमूद केले आहे. त्यावर नाना पटोलेंनी आक्षेप घेतला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून काँग्रेसकडून नाना पटोले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्या निवडणुकीत पटोले यांचा पराभव झाला. मात्र आता त्याच निवडणुकीच्या अनुषंगाने पटोले यांनी गडकरीविरोधात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या या याचिकेत पटोले यांनी गडकरी यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीवेळी गडकरी यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या माहितीमध्ये त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत शेती असल्याचे नमूद केले आहे. त्यावर नाना पटोलेंनी आक्षेप घेतला आहे.
नव्याने निवडणूक घेण्यात यावी; नाना पटोले यांची मागणी
न्यायालयाने नितीन गडकरी यांची खासदारकी रद्द करून लगेच पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी सुद्धा याचिकेतून केली आहे. नाना पटोले यांच्या याचिकेवर आता ६ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागलेले आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नाना पटोलेंनी भाजपविरोधात बंड पुकारले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून निवडणूक लढवणाऱ्या पटोलेंचा यात पराभव झाला होता.