नागपूर - नाणार प्रकल्पाला तीव्र विरोधानंतर प्रकल्पासाठी आता बारसूचे नाव पुढे आले असून, त्यालाही विरोध होत आहे. पण, प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी ( Ashish Deshmukh on refinery in Vidarbha ) विदर्भात दिली, तर आम्ही वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सोडून देऊ, असे वक्तव्य विदर्भवादी नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा -Vadettiwar On Raj Thackeray : बडे बडे डर जाते है! राज ठाकरेंच्या भाषणावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
नाणार नंतर बारसू या ठिकाणी पेट्रोकेमिकल रिफायनरी करण्याबद्दलचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दिला आहे. पण, ही मागणी पुढे येताच बारसूमधूनही रिफायनरीला विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे, पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विदर्भात होऊ दिल्यास विदर्भाचा विकास होऊ शकेल, अशी मागणी लावून धरणाऱ्या आशिष देशमुख यांनी आज ही रिफायनरी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भात दिली, तर आम्ही विदर्भवादी वेगळ्या विदर्भाची मागणी सोडून देऊ, असे आशिष देशमुख म्हणालेत.