नागपूर - 28 डिसेंबरला काँग्रेस स्थापना दिवस असल्याने त्या निमित्ताने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सभा व्हावी अशी राज्यभरातील नेत्यांची इच्छा आहे, यामुळे शिवाजी पार्क येथे जाहीर सभा मुंबई होत आहे, असे नाना पटोले म्हणाले. ते नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. मुंबईत होणारी सभा ही येणाऱ्या महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने स्वबळाची तयारी आहे का? असा प्रश्न विचारल्यावर नाना पटोले म्हणाले की पक्षाने जी पॉलिसी जाहीर करायची होती ती झाली आहे. यामुळे यापेक्षा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीने जे काही नुकसान झाले आहे त्यात राज्यसरकारकडून अधिकाधिक मदत कशी मिळेल यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र लिहले आहे.
वाढीव मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
पुरामुळे पडलेले घरे दीड लाखात दुरुस्त करणे शक्य नाही. त्यामुळे जाहीर झालेली मदत पुरेशी नाही ती मदत वाढवून मिळावी. पूरग्रस्तांसाठी जाहीर मदतीमध्ये सुधारणा व्हावी, शेतकऱ्यांना मदत वाढवून मिळावी. यासाठी मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
'हे भाजपच्या मनोरुग्ण मानसिकतेचे दर्शन'
भाजपने राजीव गांधी यांच्या नावाच्या पुरस्काराबद्दल आपली मनोरुग्ण वृत्ती दाखवून देण्याचे काम केले आहे. भाजपला गांधी परिवाराची भीती वाटते. त्यामुळे त्यांनी राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे नाव बदलले मोदी असे पंतप्रधान आहे, जे सरदार वल्लभ भाई पटेल यांचे नाव पुसून स्वतःचे नाव लिहितात. देशाला नवी दिशा देण्याचे काम राजीव गांधी यांनी केले होते. ही मानसिकता आहे त्याचा फरक आहे. नवीन इन्स्टिट्यूट उभारून त्यांचे नाव देता आले असते. यामुळे नावाच्या भानगडीत पडण्यापेक्षा महागाई बेरोजगारी यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच अशा पद्धतीच्या चर्चांमध्ये गुंतवत लोकांचे लक्ष भटकवण्याचे काम केले आहे. तसेच भाजप नेत्यांच्या मनसेसोबत बैठका वाढल्या आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागली म्हणून ते दुसऱ्याचा आधार घेत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा -सीएसएमटी, अमिताभ यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याची अफवा, जालन्याच्या दोघांना ठाण्यातून अटक