नागपूर -भाजपा नेते किरीट सोमैया यांना कुठलेही पुरावे नसताना बेछूट आरोप करण्याची सवय झाल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. त्यांच्या या सवयीला आळा घालण्यासाठी त्यांच्या विरोधात एक रुपयाचा दावा नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात कॉंग्रेसने दाखल केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा 1 रुपयांचा दावा दाखल केला आहे. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष हे भ्रष्टाचारी आहे, असा आरोप केला होता. सोमैया यांच्याकडे आरोप करत असतांना कोणतेही पुरावे नाही, असाही टीकाही यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. त्यांच्याकडे भष्ट्राचाराचे ठोस पुरावे असल्यास ते सादर करावे. नाहीतर भष्ट्राचाराचा आरोप केला त्यांनी माफी मागावी, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. परंतु किरीट सोमैया यांनी माफी न मागितल्याने त्यांच्यावर 1 रुपयांचा सांकेतिक स्वरूपाचा मानहानीचा दावा दाखल केला असल्याचेही यावेळी लोंढे म्हणाले.
नागपुरात किरीट सोमैया यांच्या विरोधात कॉंग्रेसने दाखल केला 1 रुपये मानहानीचा दावा
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष हे भ्रष्टाचारी आहे, असा आरोप केला होता. सोमैया यांच्याकडे आरोप करत असतांना कोणतेही पुरावे नाही, असाही टीकाही यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. त्यांच्याकडे भष्ट्राचाराचे ठोस पुरावे असल्यास ते सादर करावे. नाहीतर भष्ट्राचाराचा आरोप केला त्यांनी माफी मागावी, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते
अतुल
Last Updated : Nov 8, 2021, 4:47 PM IST