नागपुर-काँग्रेस नगरसेवक बंटी शेळकेंवर दारू पिऊन मोंटी नावाच्या तरुणाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर बंटी शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके मारहाण प्रकरण; पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले - नागपूर काँग्रेस न्यूज
काँग्रेस नगसेवक बंटी शेळके यांच्यावर दारू पिऊन मोंटी नावाच्या तरुणाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हे आरोप राजकिय हतूने प्रेरित आसल्याचा खुलासा बंटी शेळेके यांनी केला आहे.
![काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके मारहाण प्रकरण; पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले congress-corporator-bundi-shekal-has-been-charged-with-beating](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5283785-1007-5283785-1575582393290.jpg)
विधानसभा निवडणुकीत मदत न केल्यामुळे बंटी शेळके यांनी धमकी देऊन माराहाण केल्याचा आरोप एका तरुणाने केला आहे. मॉन्टी मुटकुरे असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळकेंविरोधात शिवीगाळ करत माराहाण केल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाली असून त्यामध्ये बंटी शेळके रागाच्या भरात मॉन्टी या तरुणाची कॉलर ओढून नेताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर नगरसेवक बंटी शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन मॉन्टी मुटकुरेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मॉन्टी चे वडील हे राजकीय पक्षाची संबंधित असल्यानेच सर्व आरोप झाल्याचे शेळके यांनी स्पष्टीकरण दिले.