महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संघाचे निष्ठावंत राहिलेले छोटू भोयर यांना काँग्रेसची उमेदवारी, नागपुरात भाजपला मोठे आव्हान - नागपूर महापालिका

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र उर्फ छोटू भोयर ( Ravindra Bhoyar ) यांना उमेदवारी देण्यात आली असून ते आज नामांकन अर्ज दाखल करणार आहे. त्यांनी सोमवारी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्याच रात्री त्यांना उमेदवारी जाहीर झाली. भोयर यांच्या जाण्याने संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात भारतीय जनता पक्षात सर्वकाही आलबेल नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Congress candidate of Chhotu Bhoyar
संघाचे निष्ठावंत राहिलेले छोटू भोयर यांना काँग्रेसची उमेदवारी

By

Published : Nov 23, 2021, 8:39 AM IST

Updated : Nov 23, 2021, 10:26 AM IST

नागपूर -अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( RSS ) आणि भाजपमध्ये ( BJP ) राहिलेले रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून ( Congress ) उमेदवारी जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसकडून भोयर यांना उमेदवारी देण्यात आली असून ते आज नामांकन अर्ज दाखल करणार आहे. त्यांनी सोमवारी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्याच रात्री त्यांना उमेदवारी जाहीर झाली. भोयर यांच्या जाण्याने संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात भारतीय जनता पक्षात सर्वकाही आलबेल नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

छोटू भोयर यांना काँग्रेसची उमेदवारी

'भाजपमध्ये किती अपमान सहन करायचा'

रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी काँग्रेसच्या देवडिया भवनात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. भोयर मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज होते. पक्षातील अनेक मोठे पदाधिकारी दुर्लक्ष करतात. पक्षात मोठी जबाबदारी दिली जात नाही. भाजपमधील काही लोकांकडून होत असलेला अपमान सहन करायचा नाही. अपमान सहन करणे ही संघाची शिकवण नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला राम राम करत काँग्रेसचा हात धरला.

रेशीमबाग परिसरातील नगरसेवकापासून भोयरांचा राजकीय प्रवास

  • छोटू भोयर यांची आजपर्यंतची संपूर्ण राजकीय जडणघडण ही संघ आणि भाजपमध्ये झाली. भाजप युवा मोर्चा सदस्यापासून (१९८६) त्यांनी सामाजिक जीवनाला सुरुवात केली.
  • 1997 मध्ये ते नागपूर महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग भागातून ते नगरसेवक झाले हे विशेष.
  • 2001 मध्ये भोयर नागपूर महापालिकेत उपमहापौर झाले.
  • 2003 ते 2007 या काळात भाजपचे जिल्हा सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.
  • 2009 ते 2013 पर्यंत जिल्हा सरचिटणीस राहिले.
  • 2012 मध्ये पुन्हा नगरसेवक झाले.
  • 2012 ते 2017 कालखंडात ते एनआयटीचे विश्वस्त राहिले आहेत.
  • 2017 मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून चौथ्यांदा निवडून आले.
  • 22 नोव्हेंबर 2021 रोजी भोयर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

भोयर यांच्या कुटुंबीयांचा संघ परिवारीशी असलेले नातं....

रवींद्र भोयर यांचे वडील प्रभाकर भोयर हे संघाचे प्रचारक राहिले असून त्यांनी निजामाच्या राज्यात प्रचारक म्हणून काम केले. रवींद्र भोयर यांच्या आई ताराबाई भोयर यांनीही सुरुवातीपासून संघाशी संलग्न संस्थात काम केले आहे. भाजपच्या स्थापनेपूर्वी जनसंघात ताराबाई यांनी काम केले होते. भाजपची निर्मिती झाल्यानंतर संघाचे कार्यालय असलेल्या रेशीमबाग भागातून ताराबाई भोयर या नगरसेवीका ही राहिलल्या आहे. याच वार्डातून छोटू भोयर हे सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. रवींद्र भोयर यांचे मामा डॉ. विलास डांगरे हे नागपूरमधील प्रसिद्ध होमिओपॅथीक डॉक्टर असून ते रा. स्व. संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून आजही कार्यरत आहेत.

हेही वाचा -'चौकीदारही...' वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Last Updated : Nov 23, 2021, 10:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details