नागपूर -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) यांच्या घरासमोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने गर्दी झाली ( Nitin Gadkari House Congress Bjp Clash) आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आमने-सामने येऊन वाद होण्याची परिस्थितीला मोठा पोलिस बंदोबस्त लावून सांभाळले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना परसवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याविरोधात काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार कार्यकर्ते नियोजित वेळेत गडकरी यांच्या घरासमोर काँग्रेसचे झेंडे घेऊन पोहचले आणि घोषणाबाजी सुरू केली. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.