महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'गडकरी वाड्या'पुढे काँग्रेसचे आंदोलन; पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक - पेट्रोल डिझेल दरवाढीवरुन काँग्रेसचे नागपुरात आंदोलन

काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून केंद्र सरकार झोपी गेल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मात्र या आंदोलानात सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.

nagpur
काँग्रेसचे आंदोलक

By

Published : Jul 8, 2020, 7:30 PM IST

Updated : Jul 8, 2020, 8:05 PM IST

नागपूर- पेट्रोल डिझेल दरवाढीवरून काँग्रेसकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. महिला आघाडीही या आंदोलनात सहभागी झाली. पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करा, सर्वसामान्याची पिळवणूक थांबवा, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. मात्र या आंदोलानात सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.

'गडकरी वाड्या'पुढे काँग्रेसचे आंदोलन; पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून केंद्र सरकार झोपी गेल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ होवू देणार नाही, असे सांगितले होते. मात्र आज परिस्थिती त्या विपरीत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारने यावर गांभीर्याने लक्ष देऊन हे वाढलेले दर कमी करा, अशी मागणीही करण्यात आली.

विशेष म्हणजे या आंदोलनात तरुणांचेही प्रमाण अधिक असल्याचे बघायला मिळाले. 'मोदी सरकार मुर्दाबाद'च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. सोबतच तोंडाला काळे कापड बांधून पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेधही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला. विशेष म्हणजे यात महिला काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करत 'मोदी सरकार मुर्दाबादच्या' घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे महिला अधिकच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. असे असले तरी हे आंदोलन फार वेळ चालू शकले नाही. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसल्याने आंदोलानानंतर आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली.

दुसरीकडे याच आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचेही पहायला मिळाले. नागपुरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना अशा आंदोलनात सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडवल्या जात असेल, तर वाढत्या कोरोना रूग्णांना जबाबदार कोण ? असा सवालही यावेळी उपस्थित होतो. या आंदोलानादरम्यान काही काळ वाहतुकीलाही अडथळा झाल्याचे दिसून आले.

Last Updated : Jul 8, 2020, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details