महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cold Wave Hit : नागपूर गारठलं; पुढील तीन ते चार दिवस विदर्भात थंडीची लाट

नागपूरसह विदर्भात थंडीची लाट (Cold Wave Hit Vidarbha) आलेली आहे. आज सकाळी नागपूरचे तापमान 8.3 अंश सेल्सिअस (Nagpur Cold Temperature) इतके नोंदवण्यात आले आहे. आजचा दिवस या मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे.

cold wave
थंडीची लाट

By

Published : Jan 27, 2022, 3:28 PM IST

Updated : Jan 27, 2022, 4:06 PM IST

नागपूर -नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (Regional Weather Inference and Forecast) वर्तविला अंदाजानुसार नागपूरसह विदर्भात थंडीची लाट (Cold Wave Hit Vidarbha) आलेली आहे. आज सकाळी नागपूरचे तापमान 8.3 अंश सेल्सिअस (Nagpur Cold Temperature) इतके नोंदवण्यात आले आहे. आजचा दिवस या मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे पुढील काही दिवस नागपूरसह विदर्भात शीतलहरीचा प्रभाव जाणवेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. एवढंच नाही तर तापमानाचा पारासुद्धा दोन ते तीन अंशाने खाली येणार असल्यामुळे आणखी हुडहुडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. त्यानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचे तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे.

माहिती देताना एम. एल. साहू
  • पुढील तीन ते चार दिवस विदर्भात थंडीची लाट -

गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरसह विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सहन करावा लागला होता. अनेक दिवस आकाशात ढगांचा मुक्काम राहिल्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला होता. त्याचबरोबर उत्तरेकडून येणाऱया वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यानेसुद्धा विदर्भात थंडीचा प्रभाव कमी झाला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून विदर्भातील आकाश स्वच्छ झाले असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड हवेच्या मार्गातील अडथळा देखील दूर झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील तीन ते चार दिवस विदर्भात थंडीची लाट येणार असून अनेक जिल्ह्यातील तापमान दोन ते तीन अंशाने खाली आले आहे.

  • तापमानात घट झाल्याने हुडहुडी वाढली:-

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नागपूर सोबतच संपूर्ण विदर्भाच्या तापमानात घट झालेली आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ आणि वाशीम मध्ये सर्वाधिक तापमान खाली आले आहे. गेल्या दोन दिवसात यवतमाळ येथील तापमान 7 अंशाने खाली आले आहे तर अशीच परिस्थिती नागपुरातसुद्धा बघायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसात नागपूरच्या तापमानात 6 अंश सेल्सिअसची घट नोंदवण्यात आली होती.

  • विदर्भातील जिल्ह्यांचे आजचे तापमान:-

अकोला:- 9.3 अंश सेल्सिअस
अमरावती:- 10.0 अंश सेल्सिअस
बुलढाणा:- 8.8 अंश सेल्सिअस
चंद्रपूर:- 11.4 अंश सेल्सिअस
गडचिरोली:- 11.0 अंश सेल्सिअस
गोंदिया:- 8.8 अंश सेल्सिअस
नागपूर:- 8.3 अंश सेल्सिअस
वाशीम- 12.0 अंश सेल्सिअस
वर्धा:- 09.4 अंश सेल्सिअस
यवतमाळ:- 10.0 अंश सेल्सिअस

Last Updated : Jan 27, 2022, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details