नागपूर :सर्वात महाग सीएनजी नागपूरात ( Expensive CNG in Nagpur ) मिळत आहे. नागपुरात आज सीएनजीच्या दरांमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये 6 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे नागपुरात सीएनजीचे दर 114 रुपये प्रति किलो पर्यत गेले आहेत. पेट्रोल आणि सीएनजीचे जवळजवळ सारखे आहेत त्यामुळे पेट्रोल आणि सीएनजीच्या दरात एकप्रकारे शर्यत लागल्याचं चित्र निर्माण झाले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र,सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाल्यामुळे नागपुरातील सीएनजीचे दर महाराष्ट्रातचं नाही तर देशात सुद्धा सर्वाधिक ठरण्याची आहेत.
म्हणून सीएनजी महाग झाल्याचं करण दिलं जातंय : सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने दहा दिवसांमध्ये 6 रुपयांनी सीएनजीच्या दरात सहा रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आता नागपूरात सीएनजीचे दर प्रति किलो 114 रुपये झाले आहे. एलएनजीच्या उपलब्धतेत अडचण असल्यामुळे आणि नागपुरात पुरवठादाराकडून एलएनजी आणून त्याचे रूपांतरण सीएनजी मध्ये केले जात असल्यामुळे सीएनजीच्या पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण झाल्याची माहिती आहे.