महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांनी घेतला बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सफारीचा आनंद

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे आता बाळासाहेब ठाकरे प्राणिसंग्रहालय असे नामकरण करत त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

safari
मुख्यमंत्र्यांची जंगल सफारी

By

Published : Jan 27, 2021, 1:44 AM IST

नागपूर - येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. 1941 हेक्‍टरवर विस्तारलेले गोरेवाडा प्राणी उद्यान हे तयार करण्यात आले आहे. हे प्राणिसंग्रहालय इतर संग्रहालयाप्रमाणे नसून येथे प्राण्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सफारीचा आनंद घेत आगळ्यावेगळ्या आंतरराष्ट्रीय उद्यानाच्या संकल्पनेचे कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांची जंगल सफारी

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे आता बाळासाहेब ठाकरे प्राणिसंग्रहालय असे नामकरण करत त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची जंगल सफारी -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनाप्रसंगी जंगल सफारीचा आनंद लुटला. यावेळी वाघ, बिबट, भालू हे प्राणी पाहायला मिळाल्याचा आनंद त्यांनी बोलून दाखवला. या प्राणिसंग्रहालयातील वाघाबद्दल सांगताना, हा वाघ माणूस फ्रेंडली आहे. हा वाघ सुरुवातीला गावांमध्ये धुमाकूळ घालत असे. त्याला पकडण्यात आले होते आणि सध्या त्याला या प्राणिसंग्रहालयात नैसर्गिक अधिवासात बंदिस्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे आगळेवेगळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवले.

ABOUT THE AUTHOR

...view details