महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fight Between Two Inmates : नागपूर कारागृह पुन्हा चर्चेत; दोन कैद्यांमध्ये हाणामारी? - हाणामारीच्या वृत्ताला कारागृह प्रशासनाचा नकार

दोन कैद्यांमध्ये पुन्हा जोरदार हाणामारी ( Fight between two inmates in Nagpur Central Jail ) झाल्याची घटना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ( Nagpur Central Jail ) घडली आहे. मात्र, हाणामारीच्या वृत्ताला कारागृह प्रशासनाने नकार ( Jail administration denied reports of scuffle ) दिला आहे.

Fight between two prisoners
दोन कैद्यांमध्ये हाणामारी

By

Published : Sep 14, 2022, 8:52 AM IST

नागपूर -नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ( Nagpur Central Jail ) दोन कैद्यांमध्ये पुन्हा जोरदार हाणामारी ( Fight between two inmates in Nagpur Central Jail ) झाल्याची माहिती पुढे आली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी भुरू बब्बाने मकोका कायद्या अंतर्गत कारागृहात बंदी असलेल्या आबू खानवर हल्ला ( Fight between two inmates in Nagpur Central Jail ) केला त्यामुळे कारागृहात खळबळ आहे.

मात्र, हाणामारीच्या वृत्ताला कारागृह प्रशासनाने नकार ( Jail administration denied reports of scuffle ) दिला आहे. अबू खान गेल्या चार महिन्यांपासून नागपूरच्या कारागृहात कैद आहे. अबू आणि काही कैदी आपसात चर्चा करत होते. त्याचवेळी आबुने भुरू संदर्भात वादग्रस्त विधान केले.

याची माहिती भूरूला मिळाली,त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला,बघताबघता दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यावेळी कारागृहातील कैद्यांनी दोघांचा वाद सोडवला. मात्र,या घटनेत अबूला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details