नागपूर- देशभरात येशू ख्रिस्ताचा जन्म नाताळच्या रुपाने उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नागपुरातसुद्धा ईसा-मसिहच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. नागपुरातील 'एसएफएस'मध्ये हजारो इसाई बांधव प्रार्थनेसाठी एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
नागपुरात नाताळचा उत्साह शिगेला हेही वाचा -गोव्यात नाताळ सणाचा उत्साह; मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी भाविकांची गर्दी
नागपूरच्या सर्वच चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या उत्साहात येशूचा जन्मदिन साजरा केला. ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना केली, पारंपरिक वेशभूषेत खिस्ती बांधवांच्या चेहऱ्यावर येशू जन्माचा उत्साह दिसत होता.
येशूच्या जन्मानंतर ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. देशात आणि जगात शांतता नांदू दे आणि सर्व मानवजातीचे कल्याण येशूने करावे, अशा शुभेच्छा देत ख्रिस्ती बांधवांनी नाताळ जल्लोषात साजरा केला.