नागपूर : भारतीय खांद्य संस्कृती आणि त्यात असणारे विविध पदार्थ हे सगळ्यांनाच भुरळ घालतात. पण याच व्यंजनाची लज्जत वाढवण्यासाठी नवं नवीन प्रयोग केले जात असतात शेफ यांच्याकडून. असेच काहीसे प्रयोग करतांना मूळचे नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर (Chef Vishnu Manohar)यांनी अनेक विश्व विक्रम (world record) केले आहे.
कधी 3 हजार किलोची खिचडी, 4 हजार किलोचे जळगांवचे प्रसिद्ध भरीत, तर कधी 7 हजार किलोची मिसळ अश्या पद्धतीचे व्यंजन बनवत अनेक विश्वविक्रम त्यांनी स्वतःचा नावावर केलेत. नुकताच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य त्यांनी 75 तांदळाच्या प्रकारापासून, 75 भाताच्या रेसिपी तयार करून विश्वविक्रम नोंदवला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेले वेग वेगळे वान सगळ्यांना माहीती असावे. आणि त्या अन्नदात्याच्या मेहनतीला याेग्य मुल्य मिळावे. यासाठी स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्य शेतकऱ्यांना समर्पित भावनेने त्यांनी हा विश्व विक्रम केला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा हा विश्व विक्रम तयार करण्याचा प्रवास एकंदर कसा सुरु झाला, हे जाणून घेऊ या विशेष रिपोर्ट मधून....
कॅटरिंगच्या व्यवसायातुन स्वतःच्या उद्योगाला सुरवात :मूळच्या नाशिक जिल्ह्यातील मनोहर कुटुंबात वडील दिगंबर मनोहर चित्रकार तर आई गायक होत्या. याच कुटुंबातील विष्णु यांनी कॅटरिंगच्या व्यवसायातुन स्वतःच्या उद्योगाला सुरवात केली. आज तोच मित्रांचा विष्णु, प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर या नावाने ओळखले जातात. हे नावं केवळ महाराष्ट्रपुरते राहिले नाही, तर परदेशात सातासमुद्रापार पोहचले आहे. अमेरिकेत देखील 'विष्णुजी की रसोई' (Vishnuji Ki Rasoi) या नावाने त्यांनी हॉटेल उघडले आहे. या हॉटेलात खासकरून महाराष्ट्रीयन पदार्थ वरण, भात, भाजी, पिठलं, ठेचा, भाकर हे खायला मिळत असल्याने, तिथला मराठी माणुस सुखावला आहे.
5 बाय 7 आकाराचा पराठा :कॅटरिंगच्या व्यवसाय असल्याने अनके राज्यातून आचारी त्यांच्याकडे काम करायला असायचे. पण बरेचदा काम नसल्यास आर्थिक अडचणी निर्माण व्हायच्या. असच काही घडत असतांना शेफ विष्णु मनोहर यांनी सण 2000 साली पराठा महोत्सव घेतला. या कार्यक्रमाला त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सर्वात मोठा 5 बाय 7 आकाराचा पराठा बनवत विक्रम केला. त्यातून पराठा महोत्सवाला लोकांची गर्दी झाली आणि उद्देश साध्य झाला. पुढेही फूड फेस्टिव्हल सुरू राहिला आणि अनेक पदार्थांची चव नागपूर वासियांसह परप्रांतातल्या लोकांना चाखायला मिळाली. विदर्भात खासकरून ओळख असलेला पाहूनचाराचा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. त्यामुळे भलीमोठी पुरणपोळी मुंबईत तयार करून स्वतःच्या विक्रमाच्या यादीत भर घातली.
सलग दोन दिवस 7 तास (एकूण 53 तास) पदार्थ बनवत केला मोठा विश्वविक्रम.... नुकतेच नागपुरात 53 तास सलग 750 पदार्थ बनवले गेले. हा विक्रम लोकांची भूक भागवणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना समर्पित करीत त्यांनी 53 तास स्वयंपाक केला. यावेळी त्यांनी सलग 40 तास स्वयंपाक करण्याचा अमेरिकेन शेफ बेनजमीन पेरी यांचा रेकॉर्ड मोडला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य त्यांनी 75 तांदळाच्या प्रकारापासून, 75 भाताच्या रेसिपी तयार करून विश्वविक्रम नोंदवला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेले वेग वेगळे वान सगळ्यांना माहीती असावे. आणि त्या अन्नदात्याच्या मेहनतीला याेग्य मुल्य मिळावे. यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य शेतकऱ्यांना समर्पित भावनेने त्यांनी हा विश्व विक्रम केला असल्याचं त्यांनी सांगितलं.