महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

chandrashekhar bawankule : 'शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर हनुमान चालीसा वाचली तर...' - चंद्रशेखर बावनकुळे वीज

शिवसेनेच्या ( Shivsena ) कार्यकर्त्यांनी जर भाजप नेत्यांच्या किंवा माझ्या घरासमोर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Recite ) वाचायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली असती. तर, मी त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था केली असती, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी दिली आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

By

Published : Apr 24, 2022, 7:30 PM IST

नागपूर -राज्यात सुरू झालेल्या वीज भारनियमनाच्या विरोधात आजपासून ( 24 एप्रिल ) भाजपने राज्यभर आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. भाजप सगळीकडे कंदील आंदोलन करणार आहे. त्यानंतर पुढील काळात मंत्र्यांच्या घरी कंदील सप्रेम भेट पाठवणार असल्याची माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी दिली आहे. सरकार यावर ही मानलं नाही तर शेतकऱ्यांचे आंदोलन होईल त्यात भाजप ही सहभागी असेल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.

नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत राज्यात दीड हजार मेगावॅटच्यावर अघोषित भारनियमन होत आहे. मात्र, सरकार दावा करत आहे की, अघोषित भारनियमन होत नाही. पण, प्रत्यक्षात अघोषित भारनियमन होतच असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

गडचिरोली ते कोल्हापूर भारनियमन - गडचिरोली पासून कोल्हापूर पर्यंत शेतकऱ्यांना फक्त 2 तास वीज मिळते आहे. परवा पर्यंत राज्यात अडीच हजार मेगावॅट भरनियमय होत होते, असेही बावनकुळे यांनी सांगितले आहे.

इथे भ्रष्ट्राचाराला वाव - केंद्र सरकारने 5 हजार मेगावॅटपेक्षा जास्त वीज दिली. मागच्या सरकारपेक्षा ही जास्त वीज दिली, कोळसा ही दिला. राज्य सरकारने जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कोळशाबद्दल नियोजन केले नाही. जो कोळसा पावसाळ्यात कामी आला असता. मात्र, आता ही सर्व जबाबदारी केंद्रावर टाकत आहे. वीज बाहेरुन घेऊन त्यात भ्रष्टाचार करणे हा सुद्धा उद्देश असू शकतो, अशी शंका बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

...तर मी लाडू पेढ्याचा प्रसादाचे वाटप करणार -शिवसेनेच्या ( Shivsena ) कार्यकर्त्यांनी जर भाजप नेत्यांच्या किंवा माझ्या घरासमोर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Recite ) वाचायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली असती. तर, मी त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था केली असती. पेंडॉल टाकून त्यांच्यासाठी टाळ, मृदंग आणि लाडूच्या प्रसादाची व्यवस्था केली असती, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

हेही वाचा -Rana couple sent to judicial custody : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजद्रोहचा गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details