महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

mlc election : नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरला अर्ज - विधान परिषद

विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी उमेदवारी (mlc election) अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह नागपूर शहरातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे बावनकुळे यांना स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी सलग दोन वर्षे संघर्ष करावा लागला.

Chandrashekhar Bawankule
उमेदवारी अर्ज भरताना

By

Published : Nov 22, 2021, 3:31 PM IST

नागपूर- विधान परिषद निवडणुकीत (mlc election) भारतीय जनता पक्षाचे (bjp) उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह नागपूर शहरातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे बावनकुळे यांना स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी सलग दोन वर्षे संघर्ष करावा लागला आहे. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. बावनकुळे विरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार रवींद्र उर्फ छोटू भोयर (ravindra bhoyar) काँग्रेसकडून (congress) अर्ज दाखल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक आणखीच रंजक होणार आहे.

भाजप उमेदवार बावनकुळे यांच्याशी बातचीत करताना प्रतिनिधी

चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पक्षातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी ऊर्जामंत्री पदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारून पूर्व विदर्भ प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. बावनकुळे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून बावनकुळे पक्षाचे काम करत असले तरी त्यांची नाराजी कधीही लपून राहिलेली नव्हती. उघडपणे ते या संदर्भात बोलले नाही. आज त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन -

2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवल्यामुळे पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे सलग दोन वर्षे राजकीय वनवास भोगल्यानंतर अखेर भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा -Vidhan Parishad Election : 'चंद्रशेखर बावनकुळेंचा पराभव होणार' नाराज छोटू भोयर यांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details