महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्याच्या विविध भागात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करावी - बावनकुळे - Chandrashekhar Bavankule demand helpline for peoples

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागरिक, कामगार विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. अशांसाठी सरकारने हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Chandrashekhar Bavankule start helpline for peoples
चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Apr 27, 2020, 9:10 PM IST

नागपूर - कोरोनाच्या टाळे बंदीमुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी,कामगार व नागरिक इतर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. या अडकलेल्या नागरिक व विद्यार्थांना राज्य सरकारने एक हेल्पलाईन तयार करून त्यांना त्यांच्या मुळगावी परत आणण्याची सोय सरकारने करावी, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, पुणे, औरंगाबादसह राज्यातील अनेक शहरात विदर्भातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. शिवाय मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्याचे अनेक कामगार नागपूरसह विदर्भात अडकून आहेत. या सर्वांची आरोग्य चाचणी करून प्रसंगी त्यांच्या मुळ गावी क्वारंटाईन करावे अशी त्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details