महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विदर्भात उष्णतेचा कहर... चंद्रपूर सर्वात 'हॉट'

पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे विदर्भात गेल्या सात दिवसांपासून उष्णतेचा प्रकोप वाढला आहे.

nagpur heat
विदर्भात उष्णतेचा कहर...

By

Published : May 28, 2020, 3:07 PM IST

नागपूर - गेल्या सहा दिवसांपासून उन्हाचा चढता आलेख आज सातव्या दिवशीही कायम राहिला. आज (गुरुवार) नागपुरात ४६ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र, चंद्रपूर हे आज विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. चंद्रपूरमध्ये आज 46.4 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

विदर्भात उष्णतेचा कहर...

पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे विदर्भात गेल्या सात दिवसांपासून उष्णतेचा प्रकोप वाढला आहे. ज्यामुळे हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देखील जारी केला होता. पुढील तीन दिवस उन्हाचा तडाखा असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भातील प्रमुख शहरांचे आजचे तापमान (अंश सेल्सिअस)

अकोला -- 44.6

अमरावती -- 45.0

बुलडाणा -- 41.2

चंद्रपार -- 46.4

गडचिरोली -- 43.2

गोंदिया -- 44.8

नागपूर -- 46.0

वर्धा -- 45.5

वाशिम -- 44.0

ABOUT THE AUTHOR

...view details