नागपूर : दोन ते अडीच महिन्यांपासून नागपूरसह विदर्भात सूर्य नारायण अक्षरशः आग ओकतो आहे. अनेकदा तापमानाचा पारा 45 पर्यंत गेल्यानंतर आता मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढतो की काय? अशी नागपूरकरांना भीती वाटतं आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या असानी चक्रीवादळामुळे ( Cyclone Asani ) मुख्यतः पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली ( Chance of rain in some parts of East Vidarbha ) असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. असानी चक्रीवादळाचा परिणाम दोन ते तीन दिवस ( Vidarbha Weather Update ) जाणवेल. मात्र, त्यानंतर पुन्हा सूर्य तळपणार असल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे.
दोन दिवस ढगाळ वातावरण :असानी चक्रीवादळामुळे दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण होईल. त्यामुळे तापमानात काहीसी घट होण्याची शक्यता आहे. त्यातून नागरिकांना दिलासा मिळेल. मात्र शनिवारपासून पुन्हा सूर्य तापायला लागेल. तेव्हा विदर्भातील अनेक जिल्ह्याचे तापमान 45 डिग्रीच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उष्णता वाढेल, नागरिकांनी काळजी घ्यावी :दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने आता कुलर देखील उपयोगाचे नसल्याचं दिसत आहे. तापमान वाढीमुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. पुढील काही दिवस सूर्याचा प्रकोप कायम राहणार असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दुपारच्या वेळेस तापमान सर्वाधिक असल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात निघणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.