नागपूर -पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI ) विरोधात एनआयए,( NIA ) एटीएस, केंद्र तसेच राज्य सरकडे मोठ्या प्रमाणा पुरावे उपलब्ध आहेत. यापूर्वी केरळ सरकारने पीएफआयवर बंदीची मागणी ( Kerala government demanded ban PFI ) केली होती, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( State Home Minister Devendra Fadnavis ) यांनी दिली आहे.
ते आज नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते. तपासातून अनेक पुरावे बाहेर येतील. देशात अस्थिरता निर्माण करण्याचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया षडयंत्र ( Popular Front of India ) असल्याचे फडणवीस म्हणाले. देशभरातील 11 राज्यांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) अर्थात पीएफआय या संघटनेच्या कार्यलायांवर एन आयए, एटीएसच्या धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यात काही लोकांना अटक देखील करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ काल पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेच्या आंदोलन ( Popular Front of India protested in Pune ) करण्यात आल होते. आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल (Case registered against PFI Activists in Pune ) केले आहेत.