महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Central Railway : मध्य रेल्वेने कमावले 498 कोटी तर नागपूर मंडळला 104 कोटींचा नफा

मध्य रेल्वेने एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान रेकॉर्ड 68.56 मिलियन टन माल दान केली आहे. आणि त्यातून 4 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, यामध्ये किसान रेलची भूमिका उल्लेखनीय असल्याची माहिती त्यांनी दिली.

Central Railway
Central Railway

By

Published : Mar 23, 2022, 5:00 PM IST

नागपूर:-भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे मंडळाने यावर्षी 498 कोटी रुपयांचे भंगार वस्तूंची विक्री केली आहे. त्यापैकी नागपूर मंडळाने तब्बल 104 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. या संदर्भात मध्य रेल्वेचे महा-संचालक अनिल कुमार लाहोटी यांनी माहिती दिली आहे. ते आज नागपूरच्या दौऱ्यावर आले होते. एवढंच नाही तर कोरोनाच्या कठीण काळातही मध्य रेल्वेने एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान रेकॉर्ड 68.56 मिलियन टन माल दान केली आहे. आणि त्यातून 4 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, यामध्ये किसान रेलची भूमिका उल्लेखनीय असल्याची माहिती त्यांनी दिली.

रेल्वेने दिली माहिती

मध्य रेल्वेचे महा-संचालक अनिल कुमार लाहोटी यांनी आज नागपूर ते आमला रेल्वे मार्गाचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी अनेक रेल्वे स्टेशनची पाहणी केली. त्यांनी प्रवाशांना येणाऱ्या अडचणीं सोबतच कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक विभागात विकासाचे कामेदेखील प्रगती पथावर आहेत.

भंगार विकून कमावले 104 कोटी रुपये:-
मध्य रेल्वेने गेल्या काही महिन्यांपासून भंगार समानांची विक्री सुरू केली आहे. यामध्ये जुने रेल्वे रूळ, वॅगन्स, कोच यासह अनेक भंगार झालेल्या वस्तूंचा समावेश आहे. अश्या वस्तूंचा सांभाळ करणे देखील कठीण होऊन बसले आहे. अनेक वेळात तर या लोखंडी वस्तू चोरी जाण्याची शक्यता असते. अशा भंगार वस्तूंना वेळेत न विकल्यास त्या नष्ट होण्याचीही भीती आहेत. ज्या वस्तू पुन्हा उपयोगात येणार नाही अशा वस्तूंची विभागणी करून त्या भंगारात विकण्याची प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून राबवली जात आहे. यातून मध्य रेल्वेला 104 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

फुकट्या प्रवाश्यांकडून 200 कोटी वसूल
कोरोना काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. हळूहळू आता रेल्वे गाड्या सुरू होऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची संख्या देखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही जनरल तिकीट सुरू झाले नसल्याने अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करत आहेत. अशा फुकट्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने 200 कोटी रुपये वसूल केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

अनेक गाड्यांची गती वाढणार:-
रेल्वे रुळांचे आधुनिकीकरण झालेले आहे. त्याचबरोबर रेल्वे गाड्या आणि इंजिन सुद्धा अपग्रेड झाले असल्याने येत्या काळात दुरांतो आणि राजधानी सारख्या रेल्वे गाड्यांची 110 किलोमीटर प्रती तासावरून 130 किलोमीटर प्रतितास करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महा-संचालक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली आहे.
हेही वाचा -Summer Special Train : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पाच विशेष गाड्या

ABOUT THE AUTHOR

...view details