महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 25, 2021, 3:50 PM IST

ETV Bharat / city

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary : घरी भेटायला आलेल्या व्यक्तींची भेट घ्या, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिला वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा

अटल बिहारी वाजपेयी यांना नाटकाची आणि साहित्याची फार आवड होती. त्यामुळे ते नागपुरात यायचे तेव्हा धनवटे रंगमंदिरात असलेल्या नाटकाला आवर्जून हजेरी लावत होते, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ( Central Minister Nitin Gadkari ) यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला.. वाजपेयी यांच्या जयंती ( Atal Bihari Vajpayee Birth Anniversary ) निमित्त साजरा होणाऱ्या सुशासन दिनी नागपुरात शिक्षक सहकारी संस्थेच्या सभागृहात ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

नागपूर - तुमच्या घरी भेटायला आलेला कार्यकर्ता असो की कोणी व्यक्ती त्यांची भेट घेतल्याशिवाय जाऊ नका, असे अटलजींनी सांगितले होते. ते देखील त्यांच्याकडे कोणी गेले तर त्यांची भेट नक्की घेत होते, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ( Central Minister Nitin Gadkari) यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. वाजपेयी यांच्या जयंती ( Atal Bihari Vajpayee Birth Anniversary ) निमित्त सुशासन दिनसाजरा होता. यानिमित्त नागपुरात शिक्षक सहकारी संस्थेच्या सभागृहात ते बोलत होते.

बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

वाजपेयी यांना नाटकाची होती आवड

अटल बिहारी वाजपेयी यांना नाटकाची आणि साहित्याची फार आवड होती. त्यामुळे ते नागपुरात यायचे तेव्हा धनवटे रंगमंदिरात असलेल्या नाटकाला आवर्जून हजेरी लावत होते. त्यांची साहित्यामध्ये असलेली आवड सर्वांना माहीत आहे. ते प्रखर राष्ट्रभक्त असल्याने त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी अर्पण केले होते. गुड गव्हर्नन्सच नाही तर आपली सत्ता आपले कार्य पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यासाठी काम करण्याचाही सल्ला उपस्थित कार्यक्रमात असलेल्या बुथ प्रमुख कार्यकर्त्यांना दिला.

अटल बिहारी वाजपेयी यांची माणुसकी होती संघाच्या विचारांची कटिबद्धता आणि राष्ट्रभक्ती हा त्यांच्या विचाराचा आत्मा होता. त्याने सुशासन आणि अंत्योदय हा मंत्र मानून त्यांच्या कार्याला समोर घेऊन जायचे काम करायचे. समाजातील माणसांना परमेश्वर मानून त्याच्यासाठी कार्य करायचे आहे. जोपर्यंत त्या व्यक्तीची रोटी, कपड व घर या गरजा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपले कार्य संपणार नसून त्यांच्यासाठी हे कार्य अशाच पद्धतीने सुरू ठेवायचे आहे. राष्ट्रवाद, अंत्योदय आणि भ्रष्टाचारमुक्त शासन तयार करण्याचे आवाहनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अशी व्यवस्था उभारा की, जनतेलाचा काय नगरसेवकाला जायची गरज पडणार नाही

महानगरपालिकेत सुशासन अशा पद्धतीने निर्माण केले पाहिजे की जनतेलाच काय नगरसेवकाला तिथे जाण्याची गरज पडणार नाही, अशी एक डिजिटल सिस्टम तयार करण्याचे काम करणार आहे. अटलजीने दिलेल्या विचाराचे सुशासन आणि सर्व सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करणारी अंत्योदय व्यवस्था उभी करावी, असेही यावेळी ते म्हणाले.

त्यांच्या विचारांना साक्षी ठेवून निर्माण करण्याचा संकल्प करा

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि भ्रष्टाचारमुक्त शासन निर्माण करण्याचा काम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करावे, असा सल्ला त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला. आपल्या कामांमध्ये गुड गव्हर्नन्स आणि विकास हे दोन काम समाविष्ट केले पाहिजे. त्यांच्या स्मृतीला साक्ष ठेवून सुशासन निर्माण करण्याचा संकल्प घ्यावा, असेही केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यावेळी म्हणाले.

हे ही वाचा -To protect From Cold : थंडीपासून बचावासाठी चोरलेली बाईट शेकोटी म्हणून पेटवली

ABOUT THE AUTHOR

...view details