महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raid on CAs House in Nagpur : नागपुरातील सीएच्या घरात केंद्रीय तपास यंत्रणेची धाड; अनिल देशमुख यांच्या शिक्षण संस्थेची संबंधित सांभाळायचे कामकाज - श्रीसाई शिक्षण संस्था नागपूर

विशाल खतवानी हे श्रीसाई शिक्षण संस्थेचे कामकाज ( Shrisai Education Nagpur ) आणि हिशोब सांभाळत होते. याच शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार ( Money Laundering by CA in Nagpur ) व्यवहार झाल्याची शंका आहे. त्यामुळे यासाठीच ही चौकशी करण्यासाठी आज पथक दाखल ( Investigation by central agency in Nagpur ) झाले होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे

लेवरेज ग्रीन सोसायटी
लेवरेज ग्रीन सोसायटी

By

Published : Feb 12, 2022, 4:57 PM IST

Updated : Feb 12, 2022, 5:19 PM IST

नागपूर - नागपूरच्या कोराडी परिसरातील लेवरेज ग्रीन सोसायटीमध्ये रो हाऊस 29 येथे सकाळपासूनच केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक दाखल झाले. त्यांनी जवळपास पाच तास सीएची चौकशी केली. काही कागदपत्रे घेऊन हे पथक रवाना झाले. विशाल खतवानी असे या सीएचे ( CA Vishal Khatwani ) नाव आहे.

सीए विशाल खतवानी हे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या शिक्षण संस्थेच्या संबंधित कामकाज करत असल्याचे बोलले जात आहे. नागपुरात शहरात आणखी काही ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू

हेही वाचा-Anil Deshmukh Vs Sachin Waze : अनिल देशमुखांचे नाव घेणार नाही, मला अन् माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका सचिन वाझेचा गौप्यस्फोट

विशाल खतवानी हे श्रीसाई शिक्षण संस्थेचे सांभाळायचे कामकाज
विशाल खतवानी हे श्रीसाई शिक्षण संस्थेचे कामकाज ( Shrisai Education Nagpur ) आणि हिशोब सांभाळत होते. याच शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार ( Money Laundering by CA in Nagpur ) व्यवहार झाल्याची शंका आहे. त्यामुळे यासाठीच ही चौकशी करण्यासाठी आज पथक दाखल ( Investigation by central agency in Nagpur ) झाले होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही त्यांचे नाव चर्चेत होते अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा-Anil Deshmukh Bail Application : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी

अनिल देशमुख यांच्याशी संबंधित सीए आणि व्यापारी ईडीच्या रडारवर-
अनिल देशमुख यांच्या मनी लॉंडरिंग प्रकरणात नागपुरात यापूर्वीही काही तपास यंत्रणांनी धाड टाकल्या आहेत. अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉडरिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआय आणि ईडीनेही या प्रकरणात चौकशी करत अनिल देशमुख यांच्या घरावर छापेसुद्धा टाकले होते. कागदपत्र जप्त करण्यात आले होते. तसेच नागपुरात काही सीए आणि व्यापारी यांच्यावरसुद्धा धाडी टाकत कारवाई झाली होती.


अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लोक पैसे मागायचे?
अनिल देशमुख यांच्या वैयक्तिक कर्मचार्‍यांनी किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने तुमच्याकडे कधीही पैशांची मागणी केली नाही असे म्हणणे योग्य ठरेल का? असा प्रश्न चांदीवाल आयोगाने सचिन वाझे यांना विचारला होता. त्यावेळी वाझेंनी नाही उत्तर दिले. पंरतु आता त्यांना या जबाबामध्ये बदल करायचा आहे. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लोक त्यांच्यावतीने माझ्याकडे पैसे मागायचे, असे वाझे यांनी अर्जात नमूद केले आहे.

Last Updated : Feb 12, 2022, 5:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details