नागपूर - सेलिब्रिटी ट्विट चौकशी प्रकरणात माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ट्विटमागे असणाऱ्या भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि 12 सोशल इन्फ्लून्सरचे नाव प्राथमिक चौकशीत पुढे आले असून, तपास सुरू असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर खासगी रुग्णालयातून बाहेर पडताना गृहमंत्री माध्यमांशी बोलत होते.
त्यावेळी भाजपच्या आयटी सेलप्रमुखाची चौकशी करू असे आदेश दिले होते. पण त्याऐवजी माझ्या तोंडून लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत खुलासा करताना गृहमंत्री म्हणाले की, लतादीदी आमचे दैवत आहेत. सचिन तेंडुलकर हे मोठं व्यक्तीमत्व आहे. त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता.
प्राथमिक चौकशीत नावे आली पुढे
भाजप आयटी सेलच्या प्रमुखाच्या चौकशीचे मी आदेश दिले होते. यात आयटी सेलने काही स्क्रिप्ट दिली का? याबाबतची प्राथमिक चौकशी झाली आहे. यात भाजपच्या आयटी प्रमुख आणि 12 इन्फ्लून्सरचे नावं पुढे आले आहेत.
काय होते सेलिब्रिटी ट्विट प्रकरण