नागपूर- जॉईंट इन्ट्रन्स एक्झामीनेशन म्हणजे (जेईई) मुख्य परीक्षेत गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून काल (सोमवारी) नागपुरातील काही प्रतिष्ठित कोचिंग क्लासेसच्या कार्यालयांवर सीबीआयच्या पथकाने छापा टाकून चौकशी केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. सीबीआयच्या पथकाने कोचिंग क्लासेसमध्ये तपासणी केली आहे.
जेईई मेन्स परिक्षेतील गैरप्रकाराचे नागपूर कनेक्शन तपासण्यासाठी काही कोचिंग क्लासेस मधील दस्ताऐवजाची तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे. नागपुरातील आजमशाह चौक आणि नंदनवन परिसरातील दोन कोचिंग क्लासेसवर सीबीआयच्या टीमने काल चौकशी केली. गेल्या आठवड्यात दिल्ली, जमशेदपूर, इंदूर, बंगळुरू आणि पुण्यातील काही कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपुरात तपास मोहीम राबविल्याची माहिती समोर आली आहे.