नागपूर -प्रत्येक उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहराचे तापमान 45 डिग्रीच्या वर नोंदवले जाते. त्यामुळे विदर्भात राहणाऱ्या लोकांची 'मे' महिन्यातील प्रखर उन्हात काय अवस्था होत असेल याचा विचार करूनच अनेकजन विदर्भात येण्याची हिम्मत करत नाही. देशातील इतर शहरांच्या तुलनेत विदर्भातील या चार ते पाच शहरांमध्ये तापमान इतके का वाढते? या मागील कारणे कोणते आहेत? याचा शोध घेतला तेव्हा काही रंजक माहिती पुढे आली आहे. विदर्भ हा प्रदेश कर्करेषेच्या अगदी जवळ असल्याने सूर्याच्या किरणांचा थेट मारा विदर्भावर ( Direct sunlight on Vidarbha ) होतो. सोबतच या भागात पठार किंवा डोंगर नाहीत, सपाट भूभाग ( No plateaus or mountains in Vidarbha ) आहे. त्यामुळे उत्तरंच्या राज्यातून विशेषतः राजस्थानकडून वाहणारे उष्ण वारे थेट विदर्भापर्यंत येत ( Hot winds blowing directly from Rajasthan to Vidarbha ) असल्याने देखील येथिल तापमान इतर शहरांच्या तुलनेत जास्त नोंदवले जात असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू ( Mohanlal Sahu Director Regional Meteorological Department ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
यावर्षी विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा शहराचे दिवसांचे तापमान 45 ते 46 डिग्री पर्यंत गेले होते. तर रात्रीच्या वेळी 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाला आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर भागांमध्ये देखील अनुभवायला मिळते.