नागपूर -काही तरी कॉन्ट्रॅव्हर्सी करून सतत चर्चेत राहणारे उमेदवार आपण निवडणुकीच्या कळात बघतो मात्र. काही लोक विचित्र वेश धारण करतात तर काही लोक गाजावाजा करत उमेदवारी अर्ज दाखल करायला जतात. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या शहरात अजून एक हायप्रोफाईल उमेदवार आहे. ते चक्क हेलिकॉप्टरचा प्रवास करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बुद्धम राऊत असे या बीएसपीच्या कार्यकर्त्याचे नावं आहे. त्या करता त्यांनी ना हरकत प्रमाण पत्रासाठी त्यांनी प्रक्रीया सुरु केली आहे. हे विशेष हेलिकॉप्टर मुंबई वरून बोलवण्यात येनार आहे.
आमचं ठरलंय, उमेदवारी अर्ज दाखल करायला हेलिकॉप्टर ने जाणार - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
बुद्धम राऊत हे बीयपीचे उमेदवार हेलिकॉप्टरचा वापर करून उमेदवारी अर्ज दाखल करायला जानार आहेत. या संबधित सर्व ना हरकत पत्र त्यांनी शासनाकडून घेण्याची प्रक्रीया सुरु केली आहे.
उमेदवार बुद्धम राऊत
बुद्धम राऊत त्यांच्या उत्तर नागपूर मतदार संघातून इंदोरा स्टेडियम वरून दीक्षाभूमी येतील आणि तिथून ते वाजत गाजत उमेद्वारी अर्ज दाखल करायला जातील, असे बुद्धम राऊत यांनी सांगितले. त्या मुळे प्रशासन अशी लक्षवेधी उमेवारी दाखल करण्याची परवानगी देते काय हे बघन्या सारखे राहील.