नागपूर- तोंडाला होणाऱ्या कर्करोगाच्या बाबतीत राज्याची उपराजधानी नागपूरने चिंतेत पाडणारा पहिला नंबर पटकावला आहे. एवढंच काय तर स्तन कॅन्सरच्या बाबतीत सुद्धा नागपूरसह विदर्भातील आकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जागतिक कर्करोग दिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ कृष्णा कांबळे यांच्या सोबत ईटीव्ही भारतने चर्चा केली असता, त्यांनी या विषयाचे गांभीर्य सरकारला नसल्याचा आरोप केला आहे. नागपूर आणि विदर्भात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने अल्पवयीन आणि तरुण वर्ग सुद्धा कर्करोगाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
जागतिक कर्करोग दिन : नागपूरसह विदर्भात परिस्थिती गंभीर; सरकारचे दुर्लक्ष? - National Cancer Institute, Nagpur
विदर्भात कॅन्सरचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे लहान-लहान मुलांना खर्र्याची(तंबाखुजन्य सुपारी) सवय जडली आहे. यामध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे,त्यामुळे केवळ मुख कॅन्सरच नाही तर इतर प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या देखील चिंता वाढवणारी आहे. नागपूर शहर आणि विदर्भात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच धूम्रपान करणार्यांची संख्या प्रचंड मोठी आहे.
कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक-
विदर्भात कॅन्सरचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे लहान-लहान मुलांना खर्र्याची(तंबाखुजन्य सुपारी) सवय जडली आहे. यामध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे,त्यामुळे केवळ मुख कॅन्सरच नाही तर इतर प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या देखील चिंता वाढवणारी आहे. नागपूर शहर आणि विदर्भात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच धूम्रपान करणार्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. तंबाखूचा विचार केला तर अनेक प्रकारची घातक रसायने त्यामध्ये असतात. त्यातील बरीचशी रसायने कॅन्सर करिता पोषक ठरत असल्याचा निष्कर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग केंद्राच्या सर्वेक्षणातून पुढे आलेला आहे. तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरने पुरुषांचे मृत्यूचे प्रमाण 42 टक्के तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण 19 टक्के असल्याचा अहवाल देखील पुढे आलेले आहेत.
नागपुरातील कॅन्सरची टक्केवारी
कॅन्सर या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात आता तर सर्वच वयोगटातील रुग्ण आढळून येतात. मात्र, सर्वाधिक प्रमाण हे ३५ ते ६५ वयोगटातील रुग्णांचे आहे. कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत तुम्हारे 12.9 लोकांना तोंडाचा कर्करोग झाला आहे तर हेच प्रमाण स्त्रियांमध्ये 5.3 असल्याचे ते सांगतात. अन्ननलिकेच्या यासंदर्भात पुरुषांमध्ये हे प्रमाण 6.4 टक्के आहे तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण 3.9 टक्के आहे. शिवाय लंग कॅन्सर च्या श्रेणी मध्ये पुरुषांना हे प्रमाण 6.6 टक्के इतके आहे. महिलांमध्ये मात्र लंग कॅन्सरची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. तंबाखू गुटखा, खर्रा आणि धुम्रपानाचे प्रमाण हे पुरुषांमध्ये हे सर्वाधिक असल्याकारणाने स्वरयंत्राच्या कर्करोग देखील रुग्ण नागपुरात आढळतात. त्यांचे प्रमाण 5.7 टक्के इतका आहे. महिलांच्या बाबतीत विचार केला तर तब्बल 28 टक्के महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण आढळून येतात. तर गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण हे सुमारे 13.2 टक्के इतके आहे.
लहान मुलांमध्ये आढळून येणारे कर्करोग
गेल्या काही दशकांमध्ये नागपूर जिल्ह्यात लहान मुलांमध्ये देखील विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण आढळून आले आहे. त्यामध्ये रक्ताचा कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर, डोळ्याचा कॅन्सर आणि किडनीचा कॅन्सरचा समावेश आहे. दरवर्षी आढळून येणाऱ्या एकूण लहान मुलांच्या कर्करोगात सुमारे ३८.९ टक्के कर्करोग हा रक्तातील आहे. त्यामध्ये ४५.९ टक्के रुग्ण हे पुरुष आहेत. तर २६ टक्के महिला प्रमाण आहे. या शिवाय सेंट्रल नर्व्हस सिस्टीम म्हणजेच ब्रेन कॅन्सरच्या रुग्णांची संख्या देखील १४.१ टक्के इतकी आहे. तर किडनीमध्ये होणाऱ्या कर्करोगाची टक्केवारी ५ टक्के इतकी आहे.
व्यसनाधीन लोकांमध्ये असलेल्या कॅन्सरचे प्रमाण
नागपूरचा विचार केला असता, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांसह धुम्रपानामुळे होणाऱ्या कर्करोगाची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये ओठाचा कॅन्सर झालेल्यांची टक्केवारी ही ही ०.६ इतकी आहे तर तोंडाचा कर्करोग होणाऱ्यांची संख्या १०.२ टक्के इतकी आहे. शिवाय तोंडाच्या मागचा भाग अर्थात जिभेच्या मागील भागात कॅन्सर होण्याचे प्रमाण देखील ०.९ टक्के इतके आहे तर घासाचा कर्करोग होण्याचे प्रमाण १.६ टक्के झाले आहे. या व्यतिरिक्त व्यसनाधीन लोकांमध्ये अन्ननलिकेत देखील कर्करोग आढळून येतो आणि हे प्रमाण ५.२ इतके असल्याची माहिती कर्करोग तज्ञांनी दिली आहे.