नागपूर - कोरोनाच्या काळातही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे मनमानी करत आहे. दुकाने सुरू ठेवण्याबाबत दररोज नवनवीन नियमे लादत असल्याचे सांगत सर्व व्यापारी संघटनांनी आज बंदची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर शहारतील सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
बाजारपेठा बंद'ला व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट - nagpur corona update news
अनलॉकनंतर शासनाकडून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी मुभा दिली. असे असले तरी अनेक शहरातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर दुकानांच्या नियमाचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले. नागपुरातही दुकाने सुरू झाली खरी परंतु मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून दुकानांबाबत दररोज नवनवीन नियमे लादले जात असल्याचा आरोप व्यापारी संघटनांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स व व्यापारी संघटनेकडून घेण्यात आलेल्या या बंदच्या निर्णयाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या बंदमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनलॉकनंतर शासनाकडून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी मुभा दिली. असे असले तरी अनेक शहरातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर दुकानांच्या नियमाचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले. नागपुरातही दुकाने सुरू झाली खरी परंतु मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून दुकानांबाबत दररोज नवनवीन नियमे लादले जात असल्याचा आरोप व्यापारी संघटनांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहारातील सर्वच व्यापाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात हा बंद पुकारला आहे.
सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणीही या व्यापारी संघटनांनी केली आहे. याचे पडसाद आज बाजारपेठत दिसून येत आहे. शहरातील संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स व व्यापारी संघटनांकडून आयुक्त तुकाराम मुंढे हे दररोज नवीन नियम लादल असल्याचे आरोप करण्यात येत आहे. आधीच कोरोनामुळे ग्राहक नाही अशात भरभक्कम नियम, दुकाने चालणारी तरी कशी? असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या बंदला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारपेठा बंदनंतर आयुक्त तुकाराम मुंढे काही निर्णय घेतात का? याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.