महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Businessman Commits Suicide In Nagpur : नागपूरमध्ये व्यावसायीकाची आत्महत्या, कार पेटवून सहकुटुंब आत्महत्येचा प्रयत्न

नागपूरमध्ये व्यवसायिकाने आत्महत्या ( Businessman Commits Suicide In Nagpur ) केली आहे. व्यवसायात आलेल्या पडझडीमुळे आर्थिक विवंचनेतून त्याने कारला आग लावून सकुटुंब आत्महत्येचा प्रयत्न ( Family Suicide Attempt ) केला.

Suicide by setting fire to the car
कार पेटवून व्यवसायिकाची आत्महत्या

By

Published : Jul 20, 2022, 4:30 PM IST

नागपूर -आर्थिक विवंचनेतून कारला आग लावून नागपूरमध्ये व्यवसायिकाने आत्महत्या ( Businessman Commits Suicide In Nagpur ) केली आहे. रामराज गोपालकृष्ण भट असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. व्यवसायात आलेल्या पडझडीमुळे आर्थिक विवंचनेतून त्याने कारला आग ( burning car ) लावून सकुटुंब आत्महत्येचा प्रयत्न ( Family Suicide Attempt ) केला. पण यातून इंजिनियर मुलगा आणि पत्नी बचावली. पण व्यवसायिक रामराज गोपालकृष्ण भट यांनी स्वतःच्या कारला आग लावून घेत आयुष्य संपवले. ही घटना खापरी पुनर्वसन भागात सुनसान जागेवर गाडी नेऊन मंगळवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कार पेटवून व्यवसायिकाची आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या -नागपूरचे नाटबोल्टचे व्यवसायिक असलेले रामराज भट यांच व्यवस्य होता. पण मागील काही काळापासून व्यवसाय व्यवसाय इतका अडचणीचे सापडला की यातून जगण्या मार्ग संपला. यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न संपले की काय त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. मुलगा इंजिनयर झाला पण तो सुद्धा नौकरीवर नसल्याने यातून पैश्यांची मदत होत नल्सयाने जगावे कसे असा प्रश्नाला भेडसावत होते ( Suicide Attempt Due To Financial Crisis ).

चिठ्ठी पोलिसांच्या हाती -आत्महत्या करण्यापूर्वी रामराज गोपालकृष्ण भट मुलगा नंदन आणि पत्नी संगीत यांना घेऊन जेवायला जाऊ म्हणत घराबाहेर पडले. नागपूर शहराच्या बाहेर खापरी पूनर्वसन भागात त्यांनी आपली गाडी नेली. त्याठिकाणी पत्नी आणि मुलाला एसीडीटीचे औषध घे म्हणून मुलगा आणि पत्नीला दिले. पण मुलाला संशय आल्याने त्याने ते झटकले. हा प्लॅन फेल होताच त्यांनी ज्वलनशील पदार्थ स्वतःचा गाडीत आणून ठेवले होते. ते ज्वलनशील पदार्थ त्यांचा अंगावर टाकून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवण्याच्या हेतूने पेटवून घेतले. पण यात पत्नी आणि मुलगा हे कसे बसे बाहेर पडले. पण रामराज भट यांचा निश्चय ठाम असल्याने त्यानी जीवनयात्रा संपवत बाहेर पडले नाही. भर पावसाळ्यात कारला आग लागल्याने लोकही आश्चर्यचकित झाले. काहींनी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाला पाचरण केले. पण आगीचे नेमके कारण काय हे कळले नव्हते. जेव्हा आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. तेव्हा मात्र प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली आत्महत्या पूर्वीची लिहलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणात मुलगा आणि पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -Agneepath scheme hearing: अग्निपथ योजनेसंदर्भातील याचिकांवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details