महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

४९ कोटी १९ लाखांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटप्रकरणी नागपुरात व्यावसायिकाला अटक - nagpur crime news today

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात अवैधरित्या इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात याप्रकणी जीएसटी इंटेलिजन्सकडून राज्यात मोठी कारवाई केली जात आहे.

नागपूर
नागपूर

By

Published : Dec 3, 2020, 1:38 PM IST

नागपूर - बनावट पावत्या आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावावर 49 कोटी 19 लाखांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे प्रकरण नागपुरात उघडकीस आले आहे. जीएसटी महासंचालनालयाच्या गुप्तचर विभागाने याप्रकरणी एका कंपनीच्या संचालकाला अटक केली आहे. ते बांधकाम व्यावसायिक असल्याचे पुढे आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात अवैधरित्या इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात याप्रकणी जीएसटी इंटेलिजन्सकडून राज्यात मोठी कारवाई केली जात आहे. या प्रकरणी व्यावसायिकाला अटक करताना याप्रकरणी जीएसटी इंटेलिजन्सला मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली, की आरोपीने विविध शहरांत बांधकाम कराराची सेवा दिल्याचे कागदोपत्री सादर केले. त्या अनुंषगाने बनावट कागदपत्रे जीएसटी पोर्टलवर दाखल करण्यात आली. आरोपीचा जीएसटीआयएन नागपूर येथे नोंदणीकृत होता. त्याआधारे वेगवेगळ्या शहरांमध्ये शोधमोहीम सुरू झाली. जीएसटीआयएन दिलेल्या कंपनीच्या मालकांचा शोध घेत त्यांच्या प्रतिष्ठानांची झडती घेण्यात आली. तपासादरम्यान कंपनीच्या जीएसटीआयएनचे अस्तित्व प्रत्यक्षात नसल्याचे दिसून आले. संपूर्ण कारभार हा बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरीच्या आधारे होत असल्याची बाब पुढे आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

यापूर्वीही झाली होती कारवाई

जीएसटी इनपुट टेक्स क्रेडिट घेण्याच्या नावाखाली मोठे गौडबंगाल करत असल्याचे वारंवार समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सुताचे (सिल्क, वूलन, कॉटन यार्न) व्यवहार करणाऱ्या २२ कंपन्यांनी १३५ कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले होते. मात्र, काही व्यापारी आणि कंपन्या तर आता बनावट पावत्या (invoice) आणि अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावावर तब्बल 49 कोटी 19 लाखांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे प्रकरण नागपुरात उघडकीस आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details