महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 29, 2021, 1:43 PM IST

ETV Bharat / city

रेल्वे अर्थसंकल्प: हक्काची रेल्वे पुन्हा सर्वसामान्यांना घेऊन कधी धावणार? नागपूरकरांचा सवाल

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात लॉकडाऊन काळात रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. १८ मार्च २०२० पासून सर्वसामान्य लोकांना बंद असलेला रेल्वेचा प्रवास अद्यापही पूर्ववत झाला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून प्रवासी सेवेवर निर्बंध शिथील करण्यासंदर्भात घोषणा केली जावी, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे.

हक्काची रेल्वे पुन्हा सर्वसामान्यांना घेऊन कधी धावणार?
हक्काची रेल्वे पुन्हा सर्वसामान्यांना घेऊन कधी धावणार?

नागपूर- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. १ फेब्रुवारीला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे बजेट देखील समाविष्ट असणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. येणारा अर्थसंकल्प अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरणार आहे, कारण कोरोना महामारीच्या संकटांना तोंड देत असताना सर्व प्रत्येकाचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे. त्यामुळे या रेल्वे अर्थसंकल्पात प्रत्येकाचा विचार केला जाईल का? असा प्रश्न सर्वसामान्यांन प्रवाश्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात लॉकडाऊन काळात रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. १८ मार्च २०२० पासून सर्वसामान्य लोकांना बंद असलेला रेल्वेचा प्रवास अद्यापही पूर्ववत झाला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून प्रवासी सेवेवर निर्बंध शिथील करण्यासंदर्भात घोषणा केली जावी, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे.

नागपूर रेल्वे स्टेशन

रेल्वे सेवा पूर्ववत करावी -

आपल्या देशात कोरोना महामारीचा शिरकाव झाल्यानंतर रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर अनलॉकच्या टप्प्यांमध्ये कोविड एक्सप्रेसच्या नावावर सुरू करण्यात आलेल्या काही ठराविक आणि निवडक गाड्या सुरू झाल्या. मात्र, अद्यापही सर्वसामान्य प्रवाशांना या गाड्यांमधून सहज प्रवास करणे अश्यकच आहे. रेल्वेची सेवा लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी ज्या प्रमाणे सुरू होती. तशी सेवा पूर्ववत करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. इतर प्रवासी सेवा पूर्ववत झाल्या आहेत. मात्र, सर्वसामान्य जनतेला इतर सार्वजनिक आणि खासगी वाहतूक खिशाला परवडणारी नाही. त्यामुळे लॉकडाऊन काळात गेलेले रोजगार परत मिळवण्यासाठी अनेकांना प्रवास करावा लागत आहे. मात्र, रेल्वेची उपलब्धता नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

हक्काची रेल्वे पुन्हा सर्वसामान्यांना घेऊन कधी धावणार?

रेल्वेचे भाडे वाढवू नये

कोरोना महामारीच्या काळात लोकांना सुविधा व्हावी या उद्देशाने कोविड एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या गाड्यांचे तिकीट्स काही प्रमाणात महाग आहेत, रेल्वे मंत्रालयाने लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या रेल्वे बजेट मध्ये कोणत्याही प्रकारची तिकीट दरवाढ करू नये, अशी अपेक्षा प्रवाश्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मासिक पास धारकांचा विचार व्हावा

नागपूर हे शहर राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे कामानिमित्ताने वर्धा, अमरावती, गोंदिया, भंडारा यासह चंद्रपूर येथील चाकरमानी कामाच्या निमित्ताने नागपुरला येतता. ही संख्या फार मोठी आहे. या सर्वांसाठी रेल्वेचा फार मोठा आधार आहे,मात्र गेल्या ११ महिन्यांपासून बंधनात अडकलेली रेल्वे आता पूर्ववत व्हावी आणि मासिक पास धारकांना पूर्वी प्रमाणे रेल्वे सेवेचा लाभ घेता यावा अशी आशा विदर्भ प्रवासी संघाकडून व्यक्त करण्यात आली आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details