नागपूर - बहिणीबद्दल अपशब्द काढल्याच्या कारणावरून एका तरुणाने त्याच्याच मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी परिसरात घडली आहे. गिरीश वासनिक असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर अभिषेक बोरकर आणि निलेश अंबडुरे असे मारेकऱ्यांचे नाव आहेत. गिरीशचा खून केल्यानंतर दोन्ही आरोपी पळून गेले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
नागपूर; बहिणीबद्दल अपशब्द काढल्यामुळे भावाने केला मित्राचा खून - इमामवाडा पोलीस ठाणे
गिरीश वासनिक असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर अभिषेक बोरकर आणि निलेश अंबडुरे असे मारेकऱ्यांची नावे आहेत.
मृत गिरीश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तो इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणातील मृत गिरीश आणि मारेकरी अभिषेक हे दोघेही चांगले मित्र होते. काही कारणावरून या दोघांमध्ये वैर निर्माण झाले होते. या दोघांचा मित्र निलेश हा कारागृहातून सुटल्यानंतर गिरीश आणि निलेश एका मित्राच्या घरी दारू पित होते. त्यावेळी अभिषेक देखील तिथे आला होता. त्यावेळीसुद्धा या दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळी गिरीश याने अभिषेक याच्या बहिणीबद्दल अपशब्द काढल्याने दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. तेव्हा गिरीश याने त्याच्याजवळील चाकू काढून अभिषेक वर हल्ला केला. मात्र, अभिषेकने तो हल्ला हुकवला आणि गिरीशला खाली पाडून त्याच्यावरच चाकूने सपासप वार करून गिरीशचा खून केला. अभिषेकच्या मदतीला निलेशदेखील आल्याचे बोलले जात आहे. दोन्ही आरोपी पळून गेले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.