नागपूर -डिजिटल माध्यमाचा उपयोग ऑनलाइन अभ्यासक्रमात वाढत आहे. परंतु याच ठिकाणी जिथे अभ्यास कसा करावा हे शिकवले जाते, तिथेच नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत कॉपी कशी करायची हे शिकवण्याचा उद्योग युट्यूबवरून एका महाभागाने केला आहे. यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गंभीरतेने दखल घेतली आहे. या व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागण्याचा धोका असल्याचेही सांगितले आहे. कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष शिकवण्यावर निर्बंध आले आणि ऑनलाइन शिकवण्याचा मार्ग पुढे आला. यात आता शिक्षण घेता घेता वर्ष लोटले असतांना परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्याचे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ठरवले आहे. यात एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने घरात बसून परीक्षा देताना कॉपी करता येऊ नये आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासर्व बाबींचा अवलंब करून ही साइट बनवण्यात आली. यात अटीशर्ती विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या आहेत.
'बिना टेन्शन के खुलके चिटिंग करे'
यूट्यूबर महाभागाने 'द एलपी व्हिलेजर' म्हणून चॅनल बनवले असून यावर व्हिडिओ टाकले आहे. यात 'गाइस कोई फरक नही पडेगा' म्हणत परीक्षा सुरू असतांना दुसरे टॅब ओपन करून परीक्षेचे उत्तर शोधता येऊ शकते, एक्झाम स्क्रीन समोरून हटले तरी काही फरक पडणार नाही. कॅमेरा बंद झाला तरी फरक पडणार नाही, अशी बतावणी करण्यात आली आहे. यात 'बिना टेन्शन खुलके चिटिंग कर सकते है, गाईस' अस सांगण्याचा प्रताप महाभागाने विद्यार्थ्यांना केले आहे.
विद्यापीठाच्या साइटवर अशा पद्धतीने रोखल्या जाते प्रकार
परीक्षा नियंत्रण विभागाने दावा केला आहे, की या पद्धतींना रोखण्यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे. त्याला एक्झाम प्रॉक्टरिंग असे म्हणतात. यामुळे यात 'डु आणि डोन्ट' मुलांना परीक्षा देतांना पालन करून ही परीक्षा द्यायचे असत. यासाठी आम्ही 5 वेळा वार्निंग देऊ सहाव्या वेळा मात्र परीक्षा आपोआप बंद करण्याची व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे. यात परीक्षा देतांना वेब कॅम सुरू असणे, गुगल लोकेशन, ऑडिओ हे सुरू केल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशी व्यवस्था आहे. यासोबतच स्क्रीनवरून हटल्यावर, कुठला आवाज आल्यास किंवा अन्य काही प्रकार केल्यास पाच वेळा वार्निंग देतो आणि सहाव्यांदा मात्र पेपर लॉककरून देतो, अशी व्यवस्था असल्याचा दावा परीक्षा नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल साबळे यांनी केला आहे.
'एक्झाम प्रॉक्टरिंग' म्हणजे नेमके काय?