महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रियकराच्या मित्राने केला तरुणीवर बलात्कार, अजनी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या - नागपूर बलात्कार बातमी

नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्यात पुन्हा एक बलात्काराची घटना घडली आहे. पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर अजनी पोलिसांनी रोमिओ गोडबोले यास अटक केली आहे. आरोपी रोमिओ हा पीडित तरुणीच्या प्रियकराचा मित्र असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

boyfriends friend molested to girl in nagpur
अजनी पोलीस ठाणे

By

Published : Mar 30, 2021, 8:51 PM IST

नागपूर- नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्यात पुन्हा एक बलात्काराची घटना घडली आहे. पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर अजनी पोलिसांनी रोमिओ गोडबोले यास अटक केली आहे. आरोपी रोमिओ हा पीडित तरुणीच्या प्रियकराचा मित्र असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देत आरोपीने तरुणीशी जवळीक साधून अत्याचार केला आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ती आरोपीला सुमारे एक वर्षांपासून ओळखते. पीडिता ही विद्यार्थीनी असून ती वर्धा जिल्ह्याची राहिवासी आहे. त्यामुळे ती नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या परिसरात भाडेकरू म्हणून राहते. पीडित तरुणीला गेल्या काही दिवसांपासून नैराश्याने ग्रासल्याने आरोपी रोमिओ गोडबोलेने त्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देत आरोपीने पीडित तरुणीशी जवळीक साधली होती. सोमवारी (दि. 29 मार्च) त्याने पीडितेला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे पीडित तरुणी मानसीकरित्या आणखी खचली. तिने लगेचच अजनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी रोमिओ गोडबोले विरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

पाच दिवसांपूर्वी सुद्धा बलात्काराची तक्रार

सुमारे पाच दिवसांपूर्वी अजनी पोलीस ठाण्यात 16 वर्षीय तरुणीने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती. तक्रार दाखल होताच अजनी पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा -नागपुरात शुल्लक कारणावरून दोघांनी केला मित्राचा खून; आरोपी फरार

ABOUT THE AUTHOR

...view details