नागपूर - मॉडेल बनू इच्छिणाऱ्या तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यामध्ये घडली. पांढुर्णा-केळवद महामार्गावर शनिवारी रात्री शरीरावर खोल जखमा असलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला.
नागपुरात चारित्राच्या संशयावरुन मॉडेल प्रेयसीची हत्या; प्रियकराला अटक - मॉडेल
मॉडेल बनू इच्छिणाऱ्या तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
प्रियकराने केली प्रियसीची हत्या
खुशी परिहार (वय 20) हिला मॉडेल व्हायचे होते. ती हिंगणा तालुक्यातील डिगडोह येथे तिच्या प्रियकरासोबत राहत होती. आरोपी अशरफ शेख (वय 28) असे प्रियकराचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही सोबत राहत होते. अशरफला तिच्या चारित्र्यावर संशय गेल्याने त्याने खुशीची हत्या केली असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अशरफ शेखला अटक केली असून सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.