नागपूर - शहरात प्रेम प्रकरणातून २० वर्षीय तरुणीची हत्या ( Murder of 20 year old girl in love affair ) झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इम्प्रेस मॉलच्या चौथ्या माळावरील निर्मनाधीन जागेवर आरोपीने तरुणीचा गळा ओढणीने आवळून हत्या ( Boyfriend Kills Girlfriend in Nagpur ) केल्याचे निष्पन्न झाले आहे. फरजाना कुरेशी असे मृतक तरुणीचे नाव आहे तर मुजाहिद अन्सारी असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
लग्न जमल्याने प्रेयसीची केली हत्या -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृतक फरजाना कुरेशी आणि आरोपी मुजाहिद अन्सारी यांच्यात प्रेमसंबंध होते. ते दोघेही लग्न करणार होते. मात्र काही दिवसाआधी तरुणीचे लग्न दुसऱ्या मुलाशी पक्के झाले होते. त्यामुळे संतापलेल्या आरोपी मुजाहिद अन्सारीने तिला भेटण्यासाठी बोलवले होते. दोन डिसेंबर रोजी फरजाना कुरेशीला निर्मनाधीन जागा असलेल्या इम्प्रेस मॉलच्या चौथ्या माळावर बोलवून तिची हत्या केल्याची कबुली आरोपी मुजाहिद अन्सारीने दिली आहे. तर फरजानाचा मृतदेह हा इम्प्रेस मॉलच्या चौथ्या माळावरील निर्मनाधीन जागेत 8 डिसेंबर पर्यंत घटनेचा उलगडा होईपर्यंत तसाच पडून होता, त्यामुळे तो मृतदेह पूर्णपणे कुजला होता. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आरोपी मुजाहिद अन्सारी याला अटक केली आहे.
मिसिंगच्या तक्रारीवरून हत्येचा उलगडा -