महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी भाजपा चक्का जाम आंदोलन करणार - सुधीर मुनगंटीवार - ओबीसीचे राजकीय आरक्षण

26 जुलैला नागपुरात राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहराच्या व्हेरायटी चौकात चक्क जाम आंदोलन केले जाईल. यासोबत राज्यभरात 1 हजार ठिकाणी रस्त्यावर उतरून कुंभकर्ण झोप घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठीचे हे आंदोलन असल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकारचा जन्मच बेईमानी करून झाला असून मागील दीड वर्षापासून हे सरकार कोमामध्ये आहे. यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी इतके दिवस काहीच केले नाही, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार

By

Published : Jun 24, 2021, 8:56 AM IST

नागपूर - महाविकास आघाडी सरकार ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकवण्यात नापास झाले आहे. सरकारच्या उदासीन धोरणामुळे सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकू न शकेल्याने हे आरक्षण रद्द झाले आहे. यामुळे राज्य सरकारने 100 वकील सुप्रीम कोर्टात उभे करावे. मात्र 19 जुलैला होऊ घातलेल्या निवडणुकावर स्थगिती आणावी. यासोबतच सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी 26 जुलैला समाजिक न्याय दिनी राज्यभर ओबीसीला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

26 जुलैला नागपुरात राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहराच्या व्हेरायटी चौकात चक्क जाम आंदोलन केले जाईल. यासोबत राज्यभरात 1 हजार ठिकाणी रस्त्यावर उतरून कुंभकर्ण झोप घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठीचे हे आंदोलन असल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकारचा जन्मच बेईमानी करून झाला असून मागील दीड वर्षापासून हे सरकार कोमामध्ये आहे. यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी इतके दिवस काहीच केले नाही. रामायणातील कुंभकर्ण सहा महिने झोपत होता. पण हे सरकार 12 महिने झोपून राहत असल्याने डबल कुंभकर्ण आहे. यामुळे सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी भाजप समर्थक नसले तरी ओबीसी आरक्षणाच्या आणि सामाजिक न्याय या प्रश्नासाठी भाजपच्या चक्काजाम आंदोलनामध्ये सर्वसामान्यांनी सहभाग द्यावा. जर कोणी इच्छुक असेल आणि भाजपच्या बॅनरखाली बसायचे नसेल तर बाजूला बसण्याची व्यवस्था करू पण या सामाजिक आंदोलना सहभागी व्हा, असेही आवाहन भाजप नेते मुनगंटीवार यांनी केलेत.

अधिवेशनाचा कालावधी वाढवावा..

राज्य सरकारने राज्याचे अनेक महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे असताना केवळ दोनच दिवसाचे अधिवेशन बोलावले आहे. तसेच कोरोनाचे कारण सांगून दोन दिवसाचे अधिवेशन बोलवले मग निवडणुकीच्या दिवशी कोरोना शांत आणि अधिवेशन येताच कोरोना कसा वाढतो, असा सवाल त्यांनी केला. या सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रत्येक पक्षाचा एक दिवस या सूत्राप्रमाणे किमान तीन दिवसांचे अधिवेशन होणे अपेक्षित होते. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला स्थान नाही, म्हणून की काय दोन दिवसाचेच आशिवेशन ठेवले असा टोला त्यांनी लावला. तसेच अधिवेशनाचा कालावधी वाढवून मराठा आरक्षण, शेतकरी, धानाचा प्रश्न, यावर चर्चा करण्यासाठी वेळ नसून दारूचे बार बंद राहिल्याने त्यांना बिल माफ करावे असे सांगणारे मंत्री आहे. यामुळे सरकारचे मंत्री शेतकऱ्यांनी चिंता करण्याऐवजी दारू विकणाऱ्यांची अधिक चिंता करते असे म्हणाले. कदाचित सरकारला विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला द्यायचा नसेल म्हणून की काय दोन दिवसांचे अधिवेशन ठेवले. आता काँग्रेसला स्वाभिमान नसून, अध्यक्षपद हवे नसेल तर, इतराणी काय करावे असाही सवाल करत काँग्रेसवर टीकाही केली आणि चिमटेही काढले.

निवडणुका झाल्यास संपूर्ण जागेवर ओबीसी उमेदवार उभे करू..

सरकार 19 जुलैला होणाऱ्या निवडणूक थांबवण्यास सरकार अपयशी ठरले तर या जागेवर आम्ही शंभर टक्के ओबीसी उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी उभे करू, असा निश्चय भाजपचा असल्याचे सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details