महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Municipal Council elections: नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची भाजप करणार मागणी - बावनकुळे - ओबीसी आरक्षण

नगर परिषद निवडणुका (Municipal council elections) सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यासाठी भाजपचे प्रदेशशाध्य चंद्रकांत पाटील यांचा नेतृत्वाखाली राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) भेट देणार आहेत.

Bavankule
बावनकुळे

By

Published : Jul 9, 2022, 2:53 PM IST

नागपूर:सध्या राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. त्यामुळे अतिवृष्टी, पूरपरिस्थिती उद्भवू शकते. या परिस्थितीत निवडणूक घेतल्यास 80 टक्के मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत. त्यामुळे निवडणूक घेताना या सर्व लोकांना मतदान करता यावे अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने निवडणुका घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे या निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची भाजपची मागणी असल्याचे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) म्हणालेत. या संदर्भात 92 नगर परिषदे निवडणुका पुढे ढकलण्यासाठी भाजपचे प्रदेशशाध्य चंद्रकांत पाटील (State President Chandrakant Patil) यांचा नेतृत्वाखाला राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) भेटणार असल्याचे बावनकुळे नागपूरात बोलत होते.



वीज दरवाढ ही महाविकास आघाडी सरकारचे पाप-महाविकास आघाडी सरकारच्या नाकरतेपणामुळेच वीज दरवाढ (Electricity price hike) झालेली आहे. कोळशाचे नियोजन करणे अपेक्षित असताना ते करण्यात आले नाही त्यामुळे ही वीज दरवाढ झालेली आहे. याचा भार जनतेला पुढील चार महिने भोगावे लागणार आहे. हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. आज पर्यंत कधी नव्हे इतकी प्रति युनिट दरवाढ झाली आहे असेही बावनकुळे (Bavankule) यावेळी म्हणालेत.



ओबीसी आरक्षणाचा खून महाविकास आघाडीने केला - महाविकास आघाडी सरकार असताना यांनी झोपा काढल्यात, पण इंपेरिकल डेटा तयार केला नाही. आता भाजपचे सरकार सत्तेत येऊन दोन दिवस झाले असताना ओबीसीचे आरक्षण जाणे ही फडणवीस यांची चूक असल्याचं आरोप करत आहे. पण ओबीसी आरक्षणाचा खून करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारमधील झारीच्या शुक्राचार्य यांनी केले आहे. त्यामुळे तुम्हाला बोलायचा अधिकार नाही असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना लावला. ओबीसी आरक्षण (OBC reservation) मिळवून देण्यासाठी फडणवीस सरकार मिळवून देण्याची जवाबदारी पूर्ण करतील असेही बावनकुळे यावेळी म्हणालेत.

ABOUT THE AUTHOR

...view details