महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

fadnavis on Bmc Election ओरिजिनल शिवसेना असणाऱ्या शिंदे गटासोबत निवडणूक लढवू, मुंबई महापालिकेवर भगवा फडकवू -देवेंद्र फडणवीस

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Bmc election) अनुषंगाने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशातच, भाजप (Bjp) ओरिजिनल शिवसेना (original shivsens) असणाऱ्या शिंदे गटासोबत (Shinde Group) निवडणूक लढवेल, मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार (Hoist Saffron On Bmc) अस विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केेलं आहे. ते नागपुर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Sep 6, 2022, 5:30 PM IST

नागपूरमुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Bmc election) अनुषंगाने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशातच, भाजप (Bjp) ओरिजिनल शिवसेना (original shivsens) असणाऱ्या शिंदे गटासोबत (Shinde Group) निवडणूक लढवेल, मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार (Hoist Saffron On Bmc) अस विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केेलं आहे. ते नागपुर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

ओरिजिनल शिवसेना असणाऱ्या शिंदे गटासोबत निवडणूक लढवू -देवेंद्र फडणवीस

कोणतीही निवडणूक लढवताना आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे असे समजून निवडणूक लढवावी असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना (B J P workers) दिलेला आहे. शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढणार असून मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे, ते नागपूर विमानतळावर पत्रकारांची बोलत होते.

भाजपचं मिशन महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने शरद पवार (sharad pawar) आणि कुटुंबाला आव्हान देण्याकरिता बारामतीवर लक्ष केंद्रित केलेला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की भाजपचं मिशन इंडिया (bjp mission india) आहे. त्याच प्रमाणे राज्यात भाजपने मिशन महाराष्ट्र (bjp mission maharashtra) नुसार काम सुरू आहे. बारामती देखील राज्यात असल्याने त्याकडे मिशन बारामती म्हणून बघितलं जात आहे. आमच्यासाठी राज्यातील प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

शासकीय कार्यालय आदेशाने चालतात प्रत्येकाच्या मनात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत त्यामुळे त्यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावले जावे याबद्दल अनिवार्यता करण्याची कुठलीही गरज नाही. मात्र, सरकारी कार्यालय नियमाने चालतात त्यामुळे तसे आदेश काढण्यात आले की माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, महाराष्ट्र आणि देशामध्ये ज्योतिबा फुले (mahatma jyotiba phule) आणि सावित्रीबाई फुले (savitribai phule) यांचा जो मान आहे तो फार मोठा असल्याचा देखील ते म्हणालेत.

हेही वाचा ललित मोदी आणि सुष्मिता सेनचे ब्रेकअप?

ABOUT THE AUTHOR

...view details