महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपची पुन्हा एकदा बालेकिल्ल्यातच होणार 'अग्निपरीक्षा' - नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या भारतीय जनता पक्षासमोर लवकरच एक मोठे आव्हान येणार आहेत. हे आव्हान म्हणजे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला निवडूण आणणे.

bjp devendra fadanvis
भाजप देवेंद्र फडणवीस

By

Published : Jan 29, 2020, 7:33 PM IST

Updated : Jan 29, 2020, 8:01 PM IST

नागपूर - विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत बॅकफूटवर गेलेल्या भारतीय जनता पक्षासमोर लवकरच एक मोठे आव्हान येणार आहेत. हे आव्हान म्हणजे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला निवडणूक आणणे. याचे कारण, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कधीही पराभव पाहिलेला नाही. मात्र, सध्या राजकारणातील समीकरणे पाहता भाजपपुढे यावेळी ही जागा वाचवण्याचे आव्हान असणार आहे.

भाजप प्रवक्ता गिरीश व्यास यांची प्रतिक्रिया....

हेही वाचा... नागपूर विभागात गेल्या 5 वर्षात 1,592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 617 आत्महत्या मदतीसाठी अपात्र

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. असे असले तरीही त्याची तयारी मात्र जोरात सुरू आहे. भाजपने नागपूर विभागातील ही जागा कधीच आपल्या हातातून जाऊ दिलेली नाही. त्यामुळे ही जागा वाचवण्यासाठी भाजपने आतापासुनच जोरात प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा... ' लोकांना अलंकारिक अथवा अपशब्द नव्हे, अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती ऐकायची आहे '

नागपूर विभागातून पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपसाठी महत्वाची मानली जाते. या मतदारसंघात सहा जिल्हे येतात. त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेणे आणि प्रचार करणे, म्हणजे कठीण काम. त्यामुळे उमेदवार जाहीर व्हायचे असले आणि निवडणुकीला अद्याप भरपूर वेळ असला, तरी प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. यातही भाजपने मात्र चांगलीच आघाडी घेतली आहे. यावेळी सुद्धा या जागेवर भाजपच निवडून येईल, असा विश्वास भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी व्यक्त केला.

Last Updated : Jan 29, 2020, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details