महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी? मुख्यमंत्री भाजपचाच होणार - गिरीश व्यास - गिरीश व्यास

विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असलेल्या प्रतिनिधींना त्या मतदारसंघातील इच्छूक व्यक्तींची माहिती, विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद आणि उणीवांची माहिती घेऊन त्यावर योग्य अंलबजावणी करन्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी? मुख्यमंत्री भाजपचाच होणार - गिरीश व्यास

By

Published : Aug 20, 2019, 3:45 PM IST

नागपूर -भाजपच्या नुकत्याच झालेल्या पक्ष संघटनेच्या बैठकीत २८८ विधानसभा मतदारसंघांत प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार, अशी चर्चा सर्वत्र असली तरी, भाजप पुन्हा स्वबळाची तयारी करताना दिसत आहे.

भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी? मुख्यमंत्री भाजपचाच होणार - गिरीश व्यास

विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असलेल्या प्रतिनिधींना त्या मतदारसंघातील इच्छूक व्यक्तींची माहिती, विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद आणि उणीवांची माहिती घेऊन त्यावर योग्य अंलबजावणी करन्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील एकूण २८८ मतदारसंघात आम्ही सर्वेक्षण करत आहोत, अशी माहिती भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांनी दिली आहे. शिवाय मतदार संघातील निवडणुकीपूर्वीच्या सर्वेची बाबही त्यांनी मान्य केली. तसेच काहीही झाले तरी मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details