नागपूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही बोलले नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले तसे भाषण महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही झालेले नाही. त्यांचे भाषण हा काळा दिवस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांनी केली.
हेही वाचा... नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईकर आज रस्त्यावर उतरणार; मुंबई पोलीस सज्ज
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज गुरूवारी चौथा दिवस आहे. सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या ठरावावर उद्धव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मात्र यावर नाखुष होत, विरोधी पक्षाने सभा त्याग केला. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळाले नाही. त्यांनी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली असल्याने, मुख्यमंत्र्याचे आजचे भाषण हे काळा दिवस असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हेही वाचा... विधान परिषदेच्या कामकाजचा चौथा दिवस, लक्षवेधीने होणार महत्वाच्या विषयावर चर्चा